खाजगी दलालांना हाताशी धरून शेतकऱ्यांना छळणाऱ्या बँका, सोसायटी व पतसंस्थेच्या अधिकारी कर्मचाऱ्यास संबंधित दलालांवर गुन्हे दाखल करा

0

सिल्लोड (प्रतिनिधी :- विनोद हिंगमिरे ) सिल्लोड शहर व तालुक्यामध्ये सहकारी बँका, पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, अर्बन बँक इ. चे अधिकारी व कर्मचारी खाजगी दलाल एजंटांना हाताशी धरून त्यांचे खाजगी स्वार्थासाठी कर्जदार, शेतकरी,सुशिक्षित बेरोजगार यांना कर्ज प्रकरणे मंजूर करतांना प्रचंड प्रमाणावर अडवणूक व छळवणूक करीत असून खाजगी एजंट व दलालांना हाताशी धरून प्रचंड प्रमाणावर दिशाभूल करून फसवणूक करीत असून खोटे कागदपत्र बनवणे, खोट्या कागदपत्रांवर शेतकऱ्याच्या नावे परस्पर कर्ज उचल करणे, शेतकऱ्यांची व कर्जदारांच्या अडवणूक करणे, बेकायदेशीर पैशाची मागणी करणे, वेग वेगळ्या कागदपत्राच्या नावाखाली अडवणूक करणे, बेबाकी प्रमाणपत्रासाठी अडवणूक करणे, शेतकरी नसतांना शेतकरी असल्याचे भासवून परस्पर कर्ज प्रकरणे मंजूर करून घेणे, आदी प्रकारे गरजू शेतकरी, कर्जदारांची फसवणूक व विश्‍वासघात करीत आहेत. सिल्लोड शहर व तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावे हजारो, लाखो रुपयांचे कर्ज परस्पर मंजूर करून करोडो रुपयांचा अपहार संबंधित बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दलालांना हाताशी धरून केला आहे. याबाबत संपूर्ण तालुक्यांमध्ये शेतकरीवर्ग परेशान असून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास संबंधित बँक अधिकारी, कर्मचारी भाग पाडत आहे. एवढेच नाही तर महामंडळाच्या कर्ज प्रकरणांमध्ये मंजूर कर्जाचे 25 टक्के रक्कम संबंधित अधिकारी व कर्मचारी संबंधित दलालांमार्फत “लाच” स्वरूपात घेतल्या नंतरच कर्ज प्रकरणे मंजूर करतात, अन्यथा लाभधारकास सहा-सहा महिने वर्षभर खेटा मारायला लावुन त्यांना जेरीस आणून वेगवेगळी कारणे सांगुन संबंधित कर्ज प्रकरणे निकाली काढण्यास टाळाटाळ करीत आहे. सदर छळवणुक व फसवणुकीचा प्रकार अत्यंत चिंताजनक व संतापजनक असून सिल्लोड तालुका व आणी शहरांमध्ये पीक कर्ज व इतर कर्जासाठी अडवणूक करून दलाल, एजंट यांच्यासह बँकेतील मोठे अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे कटातून केलेला छळवणुकीमुळे कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. त्यामुळे अशा सहकारी बँका, पतसंस्था, राष्ट्रीयीकृत बँका, विविध कार्यकारी सोसायटी, अर्बन बँकेचे अधिकारी व कर्मचारी व त्यांचे खासगी दलाल यांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावे खोटे कर्ज प्रकरणे, पिक कर्ज, मुद्रा लोन, महामंडळाच्या योजनांचेसकर्ज, शेती विकासासाठी कर्ज व इतर कारणासाठी शेतकऱ्यांच्या नावे खोटे बनावट कर्ज संचिका तयार करून फसवणूक करणे तसेच शेतकऱ्यांना अडवणूक करणे साधी प्रकारे अडवणूक व छळवणूक करून फसवणूक केली आहे. त्यामुळे सिल्लोड शहर व तालुक्यातील सर्व संबंधित सहकारी बँका, पतसंस्था, राष्ट्रीयीकृत बँका, विविध कार्यकारी सोसायटी, अर्बन बँका इत्यादींची चौकशी समिती मार्फत स्वतंत्र चौकशी करून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने मा. विभागीय आयुक्त यांच्यासह जिल्हाधिकारी औरंगाबाद, जिल्हा उपनिबंधक औरंगाबाद, उपविभागीय अधिकारी सिल्लोड, सहाय्यक निबंधक सिल्लोड, तहसीलदार सिल्लोड यांच्यासह संबंधितांकडे करण्यात आली असून सदर तक्रारी निवेदनावर आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील, जिल्‍हा संघटन मंत्री अजबराव मानकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. शेख उस्मान शेख ताहेर, सिल्लोड-सोयगाव विधानसभा अध्यक्ष महेशकुमार शंकरपेल्ली, सिल्लोड तालुका अध्यक्ष डॉ. दत्तात्रय गोंगे, सिल्लोड शहराध्यक्ष शेख रफीक अब्दुल रहीम, सिल्लोड शहर उपाध्यक्ष अॅड. आनंद शेळके, इस्माईल शेख सलीम शेख, नजीर तुराब तडवी, प्रा. ज्ञानेश्वर गोराडे, अॅड. रवींद्र ताठे, अॅड. संतोष बोराडे, अॅड. प्रितेश गौर, मुक्तार शहा मुसा शहा, इम्रान खान, सुनील पाटील गुळवे, विशाल पाटील शेजुळ, शेख अब्‍दुल रहीम करीम, शेख कलीम, पप्पू शहा, राजू वेलदोडे, इम्रान देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here