रेल्वे खासगीकरणाविरोधात अखिल भारतीय विरोध प्रदर्शन!

0

मनमाड – रेल्वे खासगीकरणाविरोधात अखिल भारतीय विरोध प्रदर्शन!

भारतीय रेल्वे वर फार मोठ्या प्रमाणावर खासगीकरण सुरू आहे,अनेक ट्रेन,स्टेशन,कारखाने खासगी उद्योगाला देण्याचा धडाका सरकारतर्फे सुरू आहे,याबाबतीत रेल्वेतील राष्ट्रीय संघटन ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉईस असोशियशन यांच्या केंद्रीय कार्यकारिणी च्या आदेशानुसार आज रोजी केंद्रीय इंजिनिअर कारखाना मनमाड येथे ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे विरोध प्रदर्शन करण्यात आले, .24 सप्टेंबर हा पुणे करार दिवस असून या ऐतिहासिक दिनी सदर विरोध प्रदर्शन केले करण्यात आले.विरोध प्रदर्शन करित असतांना कोविड 19 बाबत काळजी घेऊन आंदोलन केले जाणार आहे. या प्रदर्शनाच्या अनुषंगाने मनमाड येथे देखील केंद्रीय इंजिनियरिंग कारखाना मनमाड व सहाय्यक मंडळ अभियंता कार्यलय मनमाड येथे भोजन अवकाश दरम्यान 12.30 आणि 1.00 वाजता विरोध प्रदर्शन करण्यात आले.. विरोध प्रदर्शन संपन्न झाल्यावर प्रधानमंत्री व रेल्वे मंत्री यांना विभागा मार्फत निवेदन पाठविण्यात आले.
या निवेदनात रेल्वेतील खासगीकरण,निगमीकरण त्वरित थांबवावे,पदोन्नतीतील आरक्षण कायम करण्यात यावे,निजी व न्यायिक क्ष्रेत्रात आरक्षण देण्यात यावे,समान शिक्षा प्रणाली लागू करण्यात यावी, पुणे करारा अन्वये जी आरक्षण व्यवस्था लागू झाली आहे ती कायम झाली नाही तर पुणे करारातील अटी रद्द करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार मिळविले होते ते बहाल करण्यात यावे व इतर मागण्या सामाविष्ट आहे. केंद्रीय इंजिनिअर कारखाना मनमाड येथे ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन तर्फे विरोधात प्रदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.क कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण अहिरे सचिव कारखाना शाखा यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आयु.सिध्दार्थ जोगदंड (कार्याध्यक्ष कारखाना शाखा) यांनी केले यावेळी सचिन इंगळे,शरद झोबाड, प्रविण बागुल( सचिव NRMU कारखाना शाखा),प्रकाश बोडके(CRMS कारखाना शाखा), संजय दिक्षित (ऑल इंडिया ओबिसी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा) आदी ची भाषणे झाली. यावेळी महिला कामगारांच्या हस्ते मुख्य कारखाना प्रबंधक मोहम्मद फैज साहेब यांना निवेदन देण्यात आले.आभार प्रदर्शन कल्याण धिवर यांनी केले.विजय गेडाम (खजिनदार कारखाना शाखा), रमेश पगारे (आति.सचिव कारखाना शाखा), हा संदीप पगारे (वरिष्ठ उपाध्यक्ष कारखाना शाखा) सागर गरुड (उपाध्यक्ष कारखाना शाखा) सुभाष जगताप (उपाध्यक्ष कारखाना शाखा) सुनील सोनवणे.प्रदिप गायकवाड (अध्यक्ष ओपन लाईन), रत्नदिप पगारे (सचिव ओपन लाईन) .सचिन इंगळे,हर्षल सूर्यवंशी,प्रेमदीप खडताळे, राकेश ताठे, किरण आहिरे,विशाल त्रिभुवन,संदीप अर्जुन पगारे, गुलाब वैरागर, अल्ताफ खान, किशोर खंडागळे, किरण अहिरे संदीप धिवर, अर्जुन बागुल,
सागर साळवे मनोज गावंडे फकीरा सोनवणे प्रभाकर निकम रवींद्र पगारे रोहित भोसले, आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी कामगार व महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्पलॉइज असोसिएशन ओपन लाईन शाखा तर्फे विरोध प्रदर्शन करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ जोगदंड यांनी केले यावेळी रत्नदीप पगारे शरद झोबाड प्रदीप गायकवाड आदिंची भाषणे झाले आभार प्रदर्शन सम्राट गरुड खजिनदार ओपन लाईन शाखा यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन अजित जगताप रोहन उबाळे आनंद संसारे वसंत सोनवणे होळकर बाबूजी चार्बेकर बाबूजी भगवान केदारे राहुल केदारे पंकज कदम प्रतिभा पगारे सुषमा सोनवणे यांनी केले यावेळी महिला कामगारांच्या असते ए डी एम ऑफिस मधील डीडी कुलकर्णी मॅडम स्वीकारले यावेळी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता सर्वांच्या हातात काळे झेंडे व निळे झेंडे होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला मा.केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी यांना श्रध्दाजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here