कळवण तालुक्यात बेड संख्या वाढवा – छावा क्रांतिवीर सेनेची तहसीलदारांकडे मागणी

0

कळवण (प्रतिनिधी) – कळवण तालुक्यात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून दररोज कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे हि अतिशय चिंतेची बाब असून कळवण तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये बेड संख्या कमी पडत आहे.
भविष्याचा विचार करता तसेच वाढती रुग्ण संख्या पाहता कोविड सेंटर मधील बेडची संख्या वाढवा किंवा नवीन कोविड सेंटरची उभारणी करून ते तात्काळ चालू  करून भविष्यात होणारे गंभीर परिणाम टाळावेत अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे कळवण तालुकाध्यक्ष प्रदीप पगार यांनी तहसीलदार बंडू कापसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लॉक डाऊनच्या काळात नाशिक जिल्हा तसेच कळवण तालुक्यातील जनतेने काटेकोरपणे नियमांचे पालन करीत कोरोना विषाणूच्या प्रसारास शंभर टक्के आळा घातला परंतु प्रशासनाने जेव्हापासून अनलॉकची घोषणा केली तेव्हापासून कळवण तालुक्यातील जनता बऱ्याच प्रमाणात नियमांचे पालन करण्यात टाळाटाळ करतांना दिसून आली याचाच परिणाम म्हणून मागील दोन ते तीन आठवड्यांपासून कळवण शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली शहराचे तर सोडा आत्ता परिस्थिती अशी आहे कि, तालुक्यातील ग्रामीण भाग असणाऱ्या गावांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढतांना दिसून येत आहेत. आरोग्य विभागासमोर मोठे आवाहन निर्माण होत असून रुग्णांची संख्या पाहता कोविड सेंटर आत्ताच अपुरे पडत आहे येणारा काळ हा कळवण तालुक्याच्या दृष्टीने कठीण आहे याचाच विचार करून कळवण तालुक्यात कोविड सेंटर मधील बेडसंख्या त्वरित वाढवा तसेच नवीन कोविड सेंटरची उभारणी करून चालू करा अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रदीप पगार यांनी केली आहे.
___________________
महेश कुवर
कळवण तालुका प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here