केळगाव येथील जवळील कोळी वस्ती अंधारातच महावितरणचे दुर्लक्ष

0

सिल्लोड(  प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील केळगाव जवळील येथील कोळी वस्ती शिवारात गेल्या 60 वर्षापासून विज पोहचलीच नसून मागणी करुनही विजपुरवठा मिळत नसल्याने या शेतवस्तीवर अंधारच आहे गाव तेथे एसटी या प्रमाणे महावितरण कंपनीचे गाव तिथे वीज हे प्रयत्न अपूरे पडत आहे महावितरणच्या सौभाग्य योजनेतुनही येथे वीज आलेली नसल्याचे धक्कादायक चित्र पाहण्यास मिळत आहे विजेअभावी या शेतीवस्तीचे जीवन अंधारमय झाले आहे

केळगाव येथील कोळी वस्ती गट.न.364 व 455 या कोळी वस्ती शिवारात वीज नसल्याने येथील लोक आदिमानवासारखे जीवन जगत आहेत गट.न.364 मधील हारिदास धोडिंबा सपकाळ,नाना देऊबा ईगळे,पोपट देऊबा ईगळे,दिपक भागाजी ईगळे,पंडित यशवंता बावस्कर,पांडुरंग धनु बावस्कर,लक्ष्मण धनू बावस्कर व 455 मधील विशवनाथ बंडू सपकाळ,संजय बंडू सपकाळ,कडुबा सांडु सपकाळ,रामदास सांडू सपकाळ हे कुंटुब 1980 वास्तव्यास आहे तब्बल पन्नास वर्षाचा कालखंड या कुंटुबाचा अंधारातच निघून गेला आहे अनेक शिवारातही 50 वर्षापासुन उजेड नाही या शेतवस्तीवरील लोकांनी 2015 मध्ये कोटेशनही पण भरले आहे पण महावितरणने दखल घेतली नाही सौभाग्य योजनेअंतर्गत तरी आमचे भाग्य बदलेल का असा प्रशन शेतकर्‍यांना पडला आहे,कितीही महत्वाचे काम असले तरी ते बाजूला ठेवून या महिलांना सायंकाळी सुर्य मावळ्याअगोदरच व सकाळी सुर्याद्यानंतर वेळेच्या आत स्यंयपाक करुन ठेवावा लागतो
वीज नसल्याने शेतकर्‍यांना शेतात मळणीयंत्रही आणता येत नाही परिणामी शेतातील पिकवलेला माल दुसरीकडे बैलगाडीच्या किंवा ट्राॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक करुन मळणीसाठी न्यावा , विद्यार्थ्याचा अभ्यास अंधारात करावा लागतो, एकीकडे आता जग ईटरनेटच्या दुनियामध्ये वावरत असताना येथील लहान मुलांना नेमका मोबाईलचा कसा असतो हे मात्र माहीत नाहीत तर ईटरनेट काय आहे कसे समजणार आता सध्या विद्यार्थाना आॅनलाईन शिक्षण दिले जात आहेपण मात्र या मुलाना या शिक्षणापासुन वंचीत राहावे लागत आहे एकीकडे शासन दरबारी म्हणटले जाते की एक गाव ते वाडी वस्ता विजेपासुन वंचीत नाही असे सांगितले मात्र येथील कोळी वस्तीची हाल मात्र फार वाईट आहे येथील तरुण मुलांना सुध्दा पाहूणे मंडळी मुलगी देण्यास टाळाटाळ करीत असता केवळ त्यांचे कारण म्हणजे घरात काळोखच असतो.या परिवारातील अनेक मुले-मुली प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असून वीज नसल्याने त्यांना अंधारातच ज्ञानाचे धडे गिरगावे लागत आहे हे विद्यार्थी गावातील जि.प.केंद्रिय प्राथमिक शाळेत व ईतर शाळेत शिक्षण घेतात शाळेची सकाळची वेळ 9 ते 4 आहे गावापासुन शेत चार ते पाच किलोमीटर आहे वेळेत शाळेत पोहोचण्याचे ठरल्यास या चिकमुल्यांना सकाळीच सात ते आठ वाजताच निघावे लागते व चार वाजेला शाळा सुटल्यावर किमान पाच ते सहा पर्यत आपल्या दारी पोहोचतात शाळा सुटल्यानंतर घरी पोहचुन जेवण करेपर्यत अंधार होतो परिणामी अभ्यास करता येत नसल्याने या विद्यार्थाची प्रगती खुटली आहे, गट.न.364 मध्ये मागील 50 ते 55 वर्षापासुन राहत आहे मी 12 आॅगस्ट 2015 रोजी महावितरणकडे कोटेशन भरले आहे परंतू आजपर्यत दखल घेतली गेलेली नाही एक पिढी निघून जायची वेळ आली तरी आमच्या घरात उजेड पडला नाही परंतू आमच्या घरात अजुनही लाईट लागत नाही त्यामुळे आम्हाला खुप त्रास सहन करावा लागतो
हारिदास धोडिंबा सपकाळ वय (55) –  मी माझ्या पतीच्या काळापासुन या ठिकाणी वास्तव्यास आहे माझी दुसरी पिढी निघून गेली आहे आज माझे वय 67 पण मला वीज दिसली नाही यामुळे आमच्या घरी पाहुणे येण्यास टाळाटाळ करतात
चंद्रभागाबाई बंडू सपकाळ वय (67) सिल्लोड तालुक्यातील केळगाव जवळील कोळी वस्ती येथील हारिदास धोडिंबा सपकाळ यांनी 2015 मध्ये भरलेल्या कोटेशनची पावती या परिसरातील जवळपास 10 शेतकर्‍यांनी कोटेशन भरले आहे लाईण नसून त्या शेतकर्‍यांना वीज बिल घरपोच येत आहे
कोळी वस्तीवरील अशा अनेक घरात अजूनही वीज पोहचलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here