पासधारकांसाठी दोन बोगी उपलब्ध करुन द्या

0

मनमाड विषय : – पासधारकांसाठी दोन बोगी उपलब्ध करुन देणे बाबत विनंती करण्यात येते की , दि . 12 / 9 / 2020 पासून सुरु होणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसला आरक्षण असल्यामुळे पासधारकांना व इतर प्रवाशांना परवडणारे नसल्याने पासधारकांसाठी दोन बोगी उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी सर्व प्रवाशी वर्गातून केली जात आहे . मनमाड शहरात रोजगार नसल्याने मनमाड शहरातील 70 % युवा वर्ग हे रोजगार उपलब्धीसाठी नाशिकला ये – जा करतात . आरक्षण करुन प्रवास करणे परवडणारे नसल्याने पंचवटी एक्स्प्रेसला दोन बोगी पासधारकांसाठी उपलब्ध करुन द्यावी जेणे करुन त्यांना रोजगारासाठी नाशिक येथे नियमित ये – जा करता येईल व त्यांच्या कुटूंबाचाही आर्थिक प्रश्न सुटेल . तरी सदर निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार होवून पंचवटी एक्स्प्रेसला पासधारकांना दोन बोगी देण्यात यावे अन्यथा आमदार महोदयांशी चर्चा करुन तिव्र स्वरुपाचे आंदोलन हाती घेतले जाईल याची कृपया नोंद घ्यावी निलेश ताठे शिवसेना शहरसंघटक,देवेंद्र घटे,अजिंक्य साळी, सिद्धार्थ छाजेड,अक्षय शिंपी,दर्शन खैरे,पंकज कदम,भैया शहा,मिहीर मसिया यांनी निवेदन दिले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here