उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) भराडी ,विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये उत्कृष्ट काम करीत असलेल्या दोन केंद्रप्रमुख, एक मुख्याध्यापक आणि प्रत्येक केंद्रातून दोन असे 28 शिक्षकांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .पंचायत समिती सभापती डॉ. कल्पनाताई जामकर, उपसभापती श्री काकासाहेब पाटील राकडे ,डॉ. संजय जामकर, गटशिक्षणाधिकारी दिलीप शिरसाट, केंद्रप्रमुख श्री डी.के.फुसे, मंगलसिंग जाधव, श्री सज्जन टाकसाळे आणि गटसमन्वयक श्री रामचंद्र मोरे हे उपस्थित होते. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून अचानक शाळा बंद झाल्या परंतु त्यावरही मात करीत त्या काळातऑनलाइन गुगल लिंक च्या माध्यमातून तालुक्यातील सर्व कार्यरत शिक्षकांना त्यांनी पाहिलेल्या उत्कृष्ट काम करीत असलेल्या आणि नियमितपणे वक्तशीरपणे शाळेत कामकाज करणाऱ्या शिक्षकांची माहिती मागवण्यात आली होती. यामध्ये ज्या शिक्षकांना जास्तीत जास्त पसंतीची मते मिळाली अशा प्रत्येक केंद्रातील दोन शिक्षकांची निवड सन्मान करण्यासाठी करण्यात आली. सार्वमत घेऊन अशा पद्धतीने आदर्श शिक्षक निवडण्याची ही अभिनव पद्धती कदाचित महाराष्ट्रात प्रथमच सिल्लोड पंचायत समितीत शिक्षण विभागाने अवलंबिली. आपले काम कोणत्याही प्रसिद्धी शिवाय करणाऱ्या वाडी वस्ती वरील शिक्षकांच्या कामाचे स्वरूप आणि त्यांनी दिलेले योगदान यानिमित्ताने सर्वांसमोर आले. उत्कृष्ट शिक्षकांची निवड करण्याचीही ही अभिनव कल्पना गटशिक्षणाधिकारी डी टी शिरसाठ यांनी राबविली. राज्यभरातून या अभिनव कल्पनेचे भरभरून स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्री एस. पी. जायस्वाल, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण आणि कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ग्रुपचे संस्थापक श्री विक्रम अडसूळ ,संयोजक श्री सोमनाथ वाळके यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे विशेष स्वागत केले आहे. शिक्षकांच्या सन्मान सोहळ्यासाठी महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे श्री मिलिंद घोरपडे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्री राहुल पवार,शिक्षक परिषदेचे श्री डी.टी.गव्हाणे, श्री सागर पालोदकर आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन, नियोजन आणि बहारदार सूत्रसंचालन केंद्रप्रमुख श्री सज्जन टाकसाळे यांनी केले. तालुक्यातील सर्वच शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट शिक्षक निवडण्याच्या शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गट साधन केंद्रातील विषय साधन व्यक्ती श्री सोनकांबळे, श्री तांबोळी, श्री गिराम ,श्री काळम पाटील यांनी परिश्रम घेतले. सन्मान मूर्ती पुढीलप्रमाणे:-याप्रसंगी श्री.डी.के.फुसे (केंद्रप्रमुख सिल्लोड), श्री.व्ही.जी.कुंभारे (केंद्रप्रमुख आमठाणा), श्री.एन.बी.गवळी (मुख्याध्यापक कासोद) ,सहशिक्षक जी.आर.देवकर, श्रीमती. एम. बी.एंडोले, पी.डी.गाडेकर, श्रीमती. एल.के.कामे, आर.यु.परदेशी, एस.आर.गोरे, आर.एम.पवार, व्ही.बी.टीप्रमवार, एस.ए.पाटील, पी.जे.वाघ, आर.व्ही.कलकोटे, के.ए.शेळके, आर.एस.तेलंगराव, रौफ कबीर शहा, एस.ए.शिंदे, के.व्ही.वाकुडे, जी.बी.धनवई, डी.ए.पटवारी, श्रीमती.अतिक बेगम वाहेद खान पठाण, डी.बी.चव्हाण, ए.एस.पोघे, व्ही.बी.ढोबळे, ए.जी.पवार, श्रीमती. एस.एस.कामे, श्रीमती.एच.जी.चौधरी, पी.ए.बिडकर, डी.आर.क्षीरसागर, ए.के.चाफे आदींना सन्मानित करून केलेल्या कार्याबददल गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here