इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या मराठवाडा विभागीय सचिव पदी योगेश बनकर

0

सिल्लोड प्रतिनिधी ( विनोद हिंगमीरे) इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या मराठवाडा विभागीय सचिव पदी झी 24 न्यूज लाईव्हचे मुख्य संपादक योगेश बनकर यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष सिराज अहमद कुरेशी यांनी केली आहे.
इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज अहमद कुरेशी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश मधुकरराव महामुनी यांच्या सहमतीने योगेश बनकर यांची नियुक्ती करण्यात आली.
योगेश बनकर यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनमध्ये ग्रामीण व शहराच्या पत्रकारांना संघटनेशी जोड़ून संघटना मजबूत करण्याचे कार्य करावे. तसेच पत्रकारावर होणा-या अन्याया विरोधात आवाज उठवण्यासाठी सदैव तत्पर रहावे. योगेश बनकर यांच्या नियुक्तीबद्दल इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष सय्यद जाकिर हुसेन, मुक्ताराम गव्हाणे (दैनिक सामना), अरविद मुरकुटे (दैनिक आनंद नगरी), राजू बिरारे (दैनिक लोकमत), नितीन दौड (दैनिक गांवकरी), जुबेर शहा (दैनिक दिव्य मराठी), अरविद वाघ (दैनिक सकाळ), गणेश जाधव (दैनिक पुढारी), संदिप मानकर (दैनिक मराठवाडा साथी), राजू गवळी (दैनिक पुण्यनगरी), संजय दांडगे (दैनिक शब्दराज), नानासाहेब गायकवाड (खासदार टाइम्स बातमीदार), साहेबराव पवार (दैनिक बाळकडू), फकरू कुरेशी (दैनिक लोकमत समाचार), सुरेश गिराम (दैनिक लोकपत्र), विशाल जाधव (दैनिक मराठवाडा केसरी), इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशनचे जालना जिल्हा अध्यक्ष असलम कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील, जळगांव जिल्हा अध्यक्ष फारुख शेख आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here