शिवसेना मनमाड शहर शाखेने निषेधार्थ कंगना राणावत याचा पुतळा दहन

0

मनमाड – शिवसेना मनमाड शहर शाखेने निषेधार्थ कंगना राणावत याचा पुतळा दहन करण्यात आला,फिल्म स्टार कंगना राणावत ही काही दिवस पासून महाराष्ट्र, मुंबई हे पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी तुलना करत आहे व मराठी माणसाच्या अस्मिता दुखवण्याचा काम केला आहे तसेच एक्केरी भाषेत शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला आहे म्हणून शिवसेना आमदार मा.श्री.सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना मनमाड शहर शाखेच्या वतीने जाहीर निषेध म्हणून देशद्रोही गद्दार कंगना राणावतचा पुतळ्याला चपलांचा हार टाकून तिचा तोंड काळ करून फुकण्यात आला तसेच गद्दार है, गद्दार है,कंगना राणावत गद्दार है, मुरदाबाद मुरदाबाद,कंगना राणावत मुरदाबाद, महाराष्ट्र मुबईचा अपमान, सहन केला जाणार नाही, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, आवाज कोणाचा शिवसेनेचा, उद्धव साहब आगे बडो, हम तुम्हारे साथ है आदि घोषणांनी परिसर शिवसैनिकांनी गाजवून सोडला.मुंबईचा, महाराष्ट्राचा म्हणजे मराठी माणसाचा अस्मितेचा अपमान शिवसेना कदापी सहन करणार नाही, शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर देईल देशद्रोही गद्दार लोकांना शिवसेना कदापि सोडणार नाही असे शिवसेना मनमाड उपशहरप्रमुख जाफर मिर्झा यांनी आपले मत मांडले तसेच शिवसेना जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
आंदोलनात शिवसेना तालुका संघटक संजय कटारिया, सुभाष माळवतकर, दिनेश केकाण, नगरसेवक लियाकत शेख,शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक संगीताताई बागुल, रेणुकाताई जयस्वाल, लीलाताई राऊत, तालुका प्रमुख विद्याताई जगताप, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख योगेश इमले, राजाभाऊ डोंडगे, कयाम सय्यद, मुराद शेख, निलेश ताठे, पंडित सानप, बाळासाहेब झालटे, किशोर कदम, अजिंक्य साळी, योगेश शर्मा, सिद्धार्थ छाजेड, हर्षल भाबड, महेश कापडणे, सागर गवळी,सनी बागुल, निखिल बगाडे, कुणाल लुनावत आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here