ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन तर्फे मनमाड रेल्वे हॉस्पिटल ला निवेदन देण्यात आले,

0

मनमाड-ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन तर्फे मनमाड रेल्वे हॉस्पिटल येथे रक्त लघवी व इतर तपासणी साठी असलेली व्यवस्था बंद आहे पूर्ववत करण्यात यावी डॉ. क्षत्रिय (सहाय्यक मंडळ चिकित्साधिकारी ,मनमाड रेल्वे दवाखाना) यांना निवेदन देण्यात आले.तसेच निवेदनाची प्रत मंडल रेल प्रबंधक भुसावळ व मुख्य चिकीत्सा अधीक्षक भुसावळ यांना ऑनलाईन पाठविण्यात आली.रक्त,लघवी व इतर तपासण्यासाठी मनमाड येथील लॅबशी रेल्वे दवाखान्यांनी टाय अप केली होते. प्रशासकीय दिरंगाई मुळे ही सेवा सध्या बंद आहे.रक्त लघवी व इतर तपासणी ची सेवा पूर्ववत करण्यासाठी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनी निवेदन दिले.यावेळी सतीशभाउ केदारे(अति.झोनल सचिव), प्रदीप गायकवाड(अध्यक्ष, ओपन लाईन),प्रवीण अहिरे(सचिव, कारखाना शाखा),रमेश पगारे(अति.सचिव, कारखाना शाखा),विजय गेडाम(खजिनदार, कारखाना शाखा),सागर गरुड (उपाध्यक्ष, कारखाना शाखा),सुभाष जगताप(उपाध्यक्ष, कारखाना शाखा) इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here