घाटनांद्रा घाट देत आहे अपघातास निमंत्रण

0

सिल्लोड ( प्रतिनिधी. विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा ते तिडका या बारा किलोमीटर रस्त्याचे काही महिन्यापूर्वी काम पूर्ण झाले होते मात्र कोरोना च्या महामारी मुळे पूर्ण रस्ते निर्मनुष्य होते एकही अवजड वाहने रस्त्यावरून वापरले नाही तरीदेखील घाटनांद्रा ते तिडका या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे रोड पूर्णपणे उखडून जात आहे
असे निकृष्ट दर्जाचे काम झाले असून याच रस्त्यावर सात किलोमीटरचा घाट लागतो मात्र त्या रस्त्याला थातूर मातुर डांबर व खडी टाकून घाईगडबडीत काम पूर्ण केले मात्र या घाटांमध्ये अवघड वळणे व अरूंद रस्ता असल्यामुळे अपघाताची शक्यता जास्त असते परंतु हा रस्ता जळगाव धुळे गुजरात जाण्यासाठी वाहनधारकांना सोयीस्कर वाटतो त्यामुळे या रस्त्यावरून वाहनधारकांची कायम वर्दळ असते मात्र सध्या अत्यावश्यक सेवेची वाहने सोडली तर सध्या तरी या ठिकाणाहून जास्त वर्दळ राहत नाही तरीदेखील या घाटात ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून अपूर्ण राहिलेले काही पुलांच्या कामे त्या ठिकाणी त्या पुलांवर जास्त पाणी झाल्यामुळे भगदाड पडून पुले धोकादायक झाली आहे. तर काही ठिकाणी रोडच्या साईडने कठडे नसल्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ठिक ठिकाणी रोड वाहून गेले आहेत तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला भगदाड पडले आहे. डोंगराची ची खोली जास्त असल्यामुळे वाहनधारकांनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे उन्हाळ्यामध्ये करण्यात आलेल्या रोडचे काम घाईगडबडीत केलेले हे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे तर रोडच्या साईडने पाणी वाहण्यासाठी एकही चारी चे बांधकाम झालेले नसल्यामुळे पूर्वी केलेल्या नाल्यांमध्ये जास्त प्रमाणात माती साचून व पावसाळ्यामध्ये दरड कोसळून त्या पूर्णपणे बंद झाले आहे त्यामुळे डोंगरातून झिरपणारे हे पाणी सगळे रोडवर वाहत आहे त्यामुळे रोड अजूनच खराब होत आहे व पाणी जास्त वाढल्यामुळे रोडच्या खेटूनच दीड ते दोन फुटाची चारी पडल्यामुळे डबल वाहन निघण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहेत तर काही ठिकाणी मोठे दगड रोडच्या कडेला ढासळले ले आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रोडकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी घाटनांद्रा येथील माझी पंचायत समिती सदस्य रामचंद्र मोरे भाजपा तालुका उपाध्यक्ष राजू पालोदकर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका उपाध्यक्ष एकनाथ सुलताने माणिक मोरे यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here