वंचित बहुजन आघाडीच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्याची तहसील कार्यालयात बैठक संपन्न

0

प्रतिनिधी ( सुनिल नजन अहमदनगर जिल्हा ) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक पाथर्डी येथील तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी तहसीलदार नामदेव राव पाटील, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, प्रा.किसनराव चव्हाण,शेवगाव तालुका अध्यक्ष पँरेलाल शेख,पाथर्डी तालुका अध्यक्ष अरविंद सोनटक्के, प्रकाश भोसले, यांच्या सह वंचित बहुजन आघाडी चे दोन्ही तालुक्यातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात प्रलंबित असलेल्या प्रश्नावर प्रचंड गदारोळ झाला.१९७७ सालापासूनच्या अतिक्रमणासह , ठेकेदारी,आणि विनापरवाना वाळूतस्करीवर उपाय योजना तयार करण्यात आली. एक महिन्याच्या आत सर्वसामान्य माणसाची कामे केली जातील असे आश्वासन दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here