मनमाड शहरातील जनतेस जाहिर आवाहन

0

मनमाड-  शहरातील जनतेस जाहिर आवाहन, याद्वारे मनमाड शहरातील जनतेस जाहिर आवाहन करण्यात येते की , शहरात दिनांक २२-०८-२०२० पासुन श्री गणेश उत्सव सुरु झालेला असुन दिनांक ०१-०९ -२०२० रोजी श्री चे विसर्जन करण्यात येणार आहे . सध्या मनमाड शहरात कोरोना विषाणु संसर्ग वाढलेला असुन कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढलेले आहे . त्या अनुषंगाने विसर्जनाचे दिवशी गर्दी होवुन कोरोना संसर्ग वाढु नये यासाठी मनमाड नगरपरीषद प्रशासन व पोलीस प्रशासनाचे वतीने विसर्जनाचे दिवशी विसर्जनाकरीता गणेश कुंड व्यतिरीक्त इतर ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था आणि मुर्ती संकलन केन्द्र निश्चित करण्यात आलेले आहेत . मुती विसर्जनाचे ठिकाणे गणेश कुंड , दत्तमंदिर रोड ट्रेनिंग कॉलेज जवळ , येवला रोड अस्तगांव रोड , बुरकुलवाडी बुधलवाडी तात्पुरते गणेश कुंड शिक्षक कॉलनी तात्पुरते गणेश कुंड मुती संकलन केन्द्र शाळा क्रमांक १४ पोलीस परेड ग्राऊंड आंबेडकर नगर प्राथमिक शाळा विवेकानंदनगर गणपती मंदिर शांतीनगर रेल्वे इन्टिट्युट वरील ठिकाणी श्री मुर्ती विसर्जन ठिकाणे व श्री मुर्ती संकलन केन्द्र निश्चित करण्यात आलेली असल्याने सर्व नागरीकांनी आपले सोयीनुसार श्री मुर्ती विसर्जन करावे अथवा संकलन केन्द्रात मुर्ती द्यावी . गणेश कुंड , दत्तमंदिर परीसरात गर्दी होवु नये यासाठी सदर परीसरात मुर्ती विसर्जनाकरीता नागरीकांना कुंडाजवळ जाण्यास मज्जाव करण्यात आलेला असुन सदर ठिकाणी येणारे भाविक यांनी श्री ची मुर्ती बॅरीकेटींग जवळ असलेले स्वयंसेवक अथवा नगरपरीषद कर्मचारी यांचेकडे विसर्जनासाठी द्यावी . विसर्जन कुंडाजवळ जाण्याचा आग्रह करु नये . तसेच रेल्वे पुलाचे पलीकडील कॅम्प व इतर भागात असलेले भक्तांनी त्यांचे श्री मुर्तीचे विसर्जन ट्रेनिंग कॉलेज जवळील विहिरीत करावे अथवा शाळा क्रमांक १४ व रेल्वे इन्टिट्युट येथे असलेले मुर्ती संकलन केन्द्रात मुर्ती जमा करावी . रेल्वे पुलाकडील नागरीकांना श्री मुर्ती विसर्जनाकरीता श्री मुर्ती घेवुन पुलावरुन गावात येता येणार नाही . सदर उत्सवाचे अनुषंगाने नागरीकांना प्रशासनाचे वतीने खालीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे . ०१ ) घरगुती श्री स्थापना केलेले नागरीकांनी श्री विसर्जनासाठी बाहेर न पडता शक्यता शक्यतो श्री मुर्तीचे घरीच विधीनुसार विसर्जन करावे किंवा आपले घराजवळील मुर्ती संकलन केन्द्रात मुर्ती द्यावी . ०२ ) गणेश कुंड दत्तमंदिर रोड येथे विसर्जनासाठी येणारे भाविकांना अगर त्यांचे वाहनांना कुंड परीसरात प्रवेश बंद करण्यात आलेला असल्याने त्यांनी श्री ची मुर्ती सदर ठिकाणी हजर असलेले स्वयंसेवक अगर नगरपरीषद कर्मचारी यांचेकडे द्यावी . श्री मुर्ती स्वत : विसर्जन करण्याचा आग्रह धरु नये . ०३ ) श्री मुर्तीची घरुनच आरती करुन आणावी विसर्जनाचे ठिकाणी आरती करु नये . ०४ ) निर्माल्य विसर्जन कुंडात न टाकता निर्माल्य कुंडातच टाकावे . ०५ ) श्री मुर्ती विसर्जसाठी येतांना लहान मुले , आबाल वृध्द व्यक्ती यांना आणु नये शक्यतो एक किंवा दोन व्यक्ती यांनीच मुर्ती विसर्जनासाठी घराचे बाहेर पडावे . ०६ ) सर्व नागरीकांनी / मंडळांनी मुर्ती विसर्जन सायंकाळी ०६-०० वाजेचे आत करुन घेणे अपेक्षीत आहे . ०७ ) विसर्जनाचे वेळी कुठल्याही प्रकारचे पारंपारीक , देशी , विदेशी वाद्य वाजविण्यास तसेच मिरवणुक काढण्यास मनाई करण्यात आलेली असुन वाद्य वाजविण्यास अगर मिरवणुक काढण्यास परवानगी देण्यात येणार नाही . तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल .०८ ) विसर्जनासाठी येणारे नागरीकांनी तोंडाला मास्क लावुन यावे व सॅनेटायझरचा वापर करावा . ० ९ ) विसर्जनाचे वेळी नागरीकांनी आपसात सामाजिक अंतर राखावे . १० ) मुर्ती संकलन केन्द्रातील मुर्ती ह्या सजवलेल्या ट्रॅक्टर मध्ये नेवुन त्यांचे विधीनुसार विसर्जन केले जाणार असल्याने नागरीकांनी व मंडळाचे पदाधिकारी यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा . ११ ) विसर्जना व्यतिरीक्त विसर्जन कुंडावर येणारे लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल त्यामुळे कोणीही विनाकारण श्री गणेश विसर्जन कुंडावर येवु नये . मुख्याधिकारी मनमाड नगरपरीषद पोलीस निरीक्षक मनमाड शहर पोलीस स्टेशन मनमाड,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here