सारोळा येथे ११ पैकी ४ जण कोरोनाबाधित रुग्ण परिसरात खळबळ,गावकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण

0

सिल्लोड ( प्रतिनिधी:- विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे दि.१९(शनिवार) रोजी ११ पैकी ४ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे.त्यामुळे सारोळा परिसरात खळबळ उढाली असून, गावकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र पालोद अंतर्गत येत असलेले गाव सारोळा येथे कोरोना कोविड पाॅझिटिव रुग्ण आढळून आले, असल्याने संपर्कात आलेल्या ११ जणांची राॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली.यामध्ये ४ जणांना कोरोनाची लागवण झाल्याचे आरोग्य विभागाच्या  निदर्शनास आले आहे.तदन्वय प्रादुर्भाव पसरू नये म्हणून,कोरोना बाधितांचा परिसर बंदी करून,त्यापुढील तपासपी सर्वेक्षण करण्यात येत आहे.अशी माहिती डाॅ. एन.ए.खाॅन वरिष्ठ राजपत्रीत वैधकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पालोद यांनी दिली.कोरोना बाधित ४ रूग्णांना सिल्लोड येथिल दुर्गा माता कोविड केअर सेंटर येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे,तर ७ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

यावर खबरदारीचा उपाय म्हणून गावात ग्रांमपंचायच्या वतीने परिसरात निर्जुतीकरण करण्यात आला व त्यांचा राहण्यात असलेला परिसर सील करण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरु न जाता काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

फोटो लाईन: सारोळा ता सिल्लोड येथे कोरोनाचे रूग्ण आढळल्या नंतर निर्जुतीकरण फवारणी करतांना ग्रा.कर्मचारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here