मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतुन ” बेरोजगारांना स्वयं रोजगाराची संधी

0

नाशिक : कोरोना महामारी परिस्थितीत सर्वसामान्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून आर्थिक दृष्टीने बळकट करण्यसाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून बेरोजगारांसाठी स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने आणण्यात आली आहे.
या योजने द्वारे टेम्पो खरेदीसाठी 15 % ते 25 % सबसिडी असुन 90% ते 95% पर्यंत बँक कर्ज उपलब्ध होणार आहे. या योजने द्वारे वस्तूंची आयात -निर्यात , फळे-भाज्या, चाट , नास्ता इत्यादी प्रकारचे फिरते व्यवसाय करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे. या योजनेचे अर्ज वाटप आणि स्वीकारण्याची तारीख दि.26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर 2020 पर्यंत असून , अर्ज मिळण्याचे ठिकाण : राष्ट्रवादी काँग्रेस भवन , मुंबई नाका , नाशिक.
सर्वसामान्य नागरिक आणि गरजवंतांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान राष्ट्रवादी काँगेस तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here