सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) महाराष्ट्राची अस्मीता असलेले, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात साहित्य क्षेत्रातील कोहिनूर हिरा म्हणून ओळख असलेले आणि रशिया सारख्या देशात जाऊन छत्रपती शिवरायांचा इतिहास समजून सांगणारे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रगण्य योगदान असलेले,गुजरात राज्याला जोडली जाणारी मुंबई महाराष्ट्राला मिळून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे, साहित्य क्षेत्रात अजरामर कीर्ती निर्माण करणारे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांना शासनाने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे तसेच मातंग समाजाच्या अनेक मागण्याकडे शासन दुर्लक्ष करत असुन प्रलंबीत मागण्या मंजुर करण्यात याव्यात अशी मागणी मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे.
रशियासारख्या देशात लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांचे भव्य असे स्मारक असुन त्या ठिकाणी एक ऑगस्ट रोजी त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.परंतु भारतात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मातंग समाजामध्ये शोकांतिका पसरलेली आहे.
त्या अनुषंघाने मानवहीत लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या आदेशावरून औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रमेश सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाकार्याध्यक्ष अशोकराव कांबळे,सिल्लोड तालुका संपर्क प्रमुख सखाराम आहिरे,तालुका अध्यक्ष नानासाहेब गायकवाड,उपाध्यक्ष बाबुराव आहिरे,युवाध्यक्ष फकिरचंद तांबे यांच्या वतीने (दि.२५) मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल तथा
ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांना सिल्लोड येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी व मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी दादाराव साठे,रवि दनके,भिकन कांबळे,संजय कांबळे,रमेश शेजुळ,विनोद जाधव,राजु कांबळे,अनिल कासारे,नितीन सौदागर,नितिन दनके,रामदास अंभोरे,एकनाथ शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.