बोरगाव बाजार व परीसरात उडीद-मुग काढणीस आलेल्या शेगांना फुटले कोम,हे नगदी पिक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले

0

सिल्लोड ( प्रतीनीधी :-विनोद हिंगमीरे) यावर्षी चांगला पाऊस पडत आसल्यामुळे पिके जोमात आली,यात मुग हे सर्वात लवकर येणारे व उडीद निमीत्त शेतकऱ्यांच्या घरात खरीप हंगामाचा श्रीगणेशा होतो,मात्र मागील पंधरा दिवसापासुन सततच्या रिपरिप पावसामुळे मुगाच्या शेंगाला कोंब फुटले आहे,यामुळे बोरगांव बाजार,तळणी,कोटनांद्रा, कासोद,बोरगांव सारवाणी,सोनाप्पावाडी,सावखेडा,

खातखेडा सहपरीसरात उडीद व मुगाच्या होणाऱ्या उत्पन्न मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे,दरम्यान परीसरात मुगाच्या शेंगा काढणीला आल्या आहे,मात्र,सततच्या पावसामुळे शेंगा ओल्या चिंब झाल्यामुळे व काढणी अभावी शेंगांना अंकुर फुटण्यास सुरूवात झाली (फुटले)आहे,व यामुळे शेतकऱ्यांचे नगदी आसलेल्या पिकाच्या भरवशावर अनेक आर्थिक व्यवहार केले जातात व मुगाचे पिक चांगले येईल, या आशेवर शेतकरी जगत असतो,या पिकाच्या पेरणीपूर्व पोषक वातावरणामुळे मुगाचे पिक जोरदार आले,पाऊसही

चांगला पडला,मात्र आता पावसाने कहर केल्या मुळे मुगाचे पिक हातचे जाण्याची भिती निर्माण झाली आहे,यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करण्याची मागणी करीत आहे.

ओळी-बोरगांव बाजार परीसरात सतत पडणाऱ्या पाऊसामुळे कोमफुटलेले उडीद व मुगाचे झाडे दाखविताना शेतकरी …..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here