सर्जा-राजा चा बैलपोळा सण उत्साहात साजरा.

0

सर्जा-राजा चा बैलपोळा सण उत्साहात साजरा…..
मनमाड : श्रावण महिन्यातील शेवटचा सण म्हणजेच शेतकऱ्यांचा खरा मित्र असणारा बैलांचा पोळा सण.वर्ष भर शेतात राबणाऱ्या आपल्या बैलां प्रति कृतन्यता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच बैल पोळा.बदलत्या काळा बरोबरच पोळा सण साजरा करण्याची पध्दत देखील बदलत गेली,पुर्वी शेतात काम करण्यासाठी शेती आवजारांची मर्यादा होती शेती कामासाठी एकमेव म्हणजेच बैलांवर अवलंबून राहावे लागायचे परंतु बदलत्या काळा नुसार शेती अवजारे आणि शेती काम करण्यासाठी ट्रक्टर सारख्या मशिनरीची प्रगती झाल्याने शेती कामा साठी बैलांचा वापर कमी होत गेल्याने शेतकऱ्यांना कडील बैलांची संख्या देखील कमी झाली. पूर्वी बैल पोळा सणाच्या एक आठवडा पहिलेच सुरवात होत असे बैलांना कडून एक आठवडा काही काम करत नसून त्यांना आराम दिला जायचा. आज देखील बैलांना सणाच्या दिवशी अंघोळ घालुन सजवण्यात आले , संध्याकाळी त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढून मारुती मंदिरा समोर त्यांना सलामी देऊन पोळा फोडण्यात आला. अनेकांनी बैलांना आपल्या घरी अवक्षण करून पुरण-पोळी खाऊ घातली. अनेक नागरिकांनी आपल्या घरी मातीच्या बैलांची पुजा करून बैल पोळा सण साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here