नगर सेवक निवडून आल्या पासून हरवला आहे

0

मनमाड- कोरोना च्या संकटात सुद्धा नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगरसेवकाला वेळ नाही, स्थानिक नगरसेवक चा फोन सतत बंद किंवा बाहेर गावी असल्याचे कारण सांगतात अशा नगरसेवकाचे पद रद्द करावे ह्या मागणी चे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे,छत्रपती शिवाजी महाराज नगर नं २केकाण नगर दरगुडे वस्ती या भागात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून त्याचा त्रास नागरिकांना होत असून नागरिकांनी जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत आहे, सदर या भागातील नगरसेवक डॉ. विनोद ठाकरे हे गेल्या चार वर्षांपासून एकदाही वॉर्डात फिरकले नाही.त्यांच्याशी संपर्क केला असता ते सतत बाहेर गावी असल्याचे कारण सांगतात सदर भागात गवताचे मोठ्या प्रमाण वाढले असून डास व माशांनी नागरिक हैराण झाले आहे, रस्त्यात मोठ- मोठया खड्यांमुळे नागरिकांना जीवमुठीत घेवुन चालावे लागते,सदर या वार्डाला कोणी वाली उरला नाही,नगरसेवक निवडून आल्यापासून हरवला आहे ,अशी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात ईमेल द्वारे केली , पिपल्स रिपब्लिकन पार्टी मनमाड शहर युवा अध्यक्ष नरेन अनिल संसारे यांनी केली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here