शेतात पाणी साचल्याने पिके पडली पिवळी

0

सिल्लोड (  प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) केळगाव परिसरातील पावसाने कपाशी,मका,सोयाबीन,मिरची, आद्रक या पिकामध्ये पाणी साचल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकर्‍यामधुन व्यक्त होत आहे
गेल्या तीन ते चार दिवसापासुन परिसरात दिवस रात्र पाऊस सुरु असल्यामुळे जमीनी संपूर्णपणे चिबडल्या आहे
केळगाव,आधरवाडी,गोकुळवाडी,कोल्हाळा तांडा आदी गावात सतत पाऊस पडत आहे या पावसाने बहरलेले पिकामध्ये पाणी साचले आहे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्याने पिके पिवळी पडु लागली आहे आतापर्यत झालेल्या सततच्या पावसाने मिरचीचे पीक सडले आहे गवत जोमात पिके कोमात गेली आहेत गवतात पाण्यात तग धरुण बसलेला मक्याने कणसे फेकली मात्र त्यावर लण्कळी अळीने विळखा घातल्याने लागवड बियाणाचा खर्चदेखील निघणार नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे

यामुळे उत्पदन घटन्याची भिती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन देण्याची मागणी केली आहे अनेक ठिकाणी शेतीला तलावाचे स्वरुप आले आहे पिके वाचवावी म्हणून शेतकरी पिकातुन बाहेर पाणी काढण्यासाठी धडपड करत आहे शेतात पाण्याचे प्रमाण जास्त झाल्या असल्याने शेतकर्‍यांच्या जमिनी चिबडल्या आहे या जमिनीत मशागत करणे सुध्दा अवघड झाले आहे पिकांना मर्यादापेक्षा जास्त पाऊस झाल्याने मका,कपाशी वाढ खुटली असुन या पिकातील अपेक्षीत उत्पादन हाती लागणार नसल्याची भीती शेतकर्‍यांना व्यक्त केली आहे

जगाचा पोशिंदा असणार्‍या शेतकर्‍यांना यंदा बांधावर खत देण्यात येतील अशी घोषणा राज्य शासनाने केली होती मात्र बांधावर खत तर सोडा शेतकर्‍यांना साधे दुकानातही युरीया मिळत नसल्याने खतासाठी शेतकर्‍यांना विविध ठिकाणी वणवण फिरावे लागत आहे

गेल्या तीन ते चार दिवसापासुन परिसरात दिवस रात्र पाऊस सुरु असल्यामुळे माझी जमीन संपूर्णपणे चिबडल्या आहे
माझी जमीन केळगाव शिवारात आहे माझे क्षेत्र पाण्यात गेले आहे कर्ज ऊसनवारी करुन पेरणी केली केलेला खर्च पाण्यात गेला आहे काहीतरी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करतो.
तातेराव कोल्हे शेतकरी केळगाव

केळगाव परिसरात अंभई मंडळात पावसाची रिमझिपामुळे परिसरातील विहिरी तुंडुब भरल्या आहेत रिमझिप पावसाला ग्रामस्थ व शेतकरी वैतागले आहे पिकांची पाहणी नुकसान भरवाई देण्यात यावी
विकास पा.मुळे भा.ज.पा.तालुका सरचिटणीसकेळगाव परिसरातील जास्तीच्या पावसामुळे केळगाव परिसरातील अशा प्रकारे पाणी साचल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here