सिल्लोड शहराच्या इतिहासामध्ये मानाचा तुरा रोवणारे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र बोकडे यांचा आम आदमी पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार

0

सिल्लोड  ( प्रतिनिधी :- विनोद हिंगमीरे ) सिल्लोड शहरात आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने सर्व परिचीत असलेले सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र बोकडे साहेब यांना नुकतच उत्कृष्ट तपास करणारे अधिकारी म्हणून भारत सरकारच्या वतीने पदक जाहीर करण्यात आले असून सिल्लोड शहरामध्ये अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ अश्या गंभीर गुन्ह्याचा तपास “केवळ एका शर्टाच्या बटन वरून” लावून आरोपींना बेड्या ठोकण्याचे काम श्री. राजेंद्र बोकडे यांनी केले असून सिल्लोड शहरामध्ये अत्यंत अभिमानास्पद असे कार्य श्री. बोकडे साहेब हे करीत आलेले असून सिल्लोड शहराच्या इतिहासामध्ये एक मानाचा तुरा पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र बोकडे साहेब यांनी लावला असून एक सिंघम अधिकारी व मनमिळाऊ अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून सिल्लोड शहरामध्ये श्री. राजेंद्र बोकडे साहेबांची एक वेगळी ओळख आहे. यावर्षी आपल्या महाराष्ट्र पोलीस दलातील १० पोलीस कर्मचाऱ्यांचे नावे या यादीत आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र बोकडे साहेब यांना उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून भारत सरकारचे पदक जाहीर झाल्याने आम आदमी पक्षाच्या वतीने मा.श्री. राजेंद्र बोकडे साहेब यांचा आप’चे औरंगाबाद जिल्हा सहसंयोजक ॲड. शेख उस्मान शेख ताहेर, जिल्हा संघटन मंत्री डॉ. दत्तात्रय गोंगे, सिल्लोड-सोयगाव विधानसभा अध्यक्ष महेश कुमार शंकरपेल्ली, सिल्लोड शहराध्यक्ष शेख रफिक, सिल्लोड तालुका उपाध्यक्ष नजीर तडवी व पदाधिकार्‍यांच्या वतीने सत्कार करण्यात आले असून श्री. राजेंद्र बोकडे यांचेवर चौफर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here