सिल्लोड ( प्रतिनिधी- विनोद हिंगमीरे ) तालुक्यातील वडाळा आहे नऊशे ते हजार लोकसंख्येचे गाव असून येथील गावात असलेली रोहित्र जळाल्याने अर्धा गाव गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अंधारात आहेत सध्या कोरोना सारख्या महामारी मध्ये विजेचा लपंडाव त्यात रात्रीचे डास मच्छर लहान मुलांना मच्छर डसने असे प्रकार घडत आहेत गेल्या पाच ते सहा दिवसापासून वडाळा येथील रोहित्र जळाले असल्याची माहिती सर्व महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती असून सुद्धा अध्याय पर्यंत सुद्धा गावात फिरकून बघितले नाही. तर संबंधित महावितरण विभाग यांनी तात्काळ वडाळा येथून नादुरुस्त झालेले रोहित्र हे नव्याने म्हणुन येथील समस्या सोडवावी अशी मागणी वडाळा येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर करत आहे,आमच्या गावातील रोहित्र हे गेल्या पाच ते सहा दिवसापासून नादुरूस्त झालेले आहे. सध्या कोरोना सारख्या या महामारी मध्ये अंधारामध्ये रात्रीचे जीवन जगणे हे खूप कठीण बनले आहे व मच्छर डान्स यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसून येत आहे तर संबंधित विभागाचे याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.-शंकर भाऊराव मानकर स्वराज्य युवा संघटना सिल्लोड तालुका उपाध्यक्ष,