नांदगाव तालुक्यातील चादेश्वेरी येथील धबधब्याच्या पाण्यात तरुणांचा बुडूनमृत्यू

0

नांदगाव ( दि.प्रतिनिधी-निखील मोरे) नांदगाव तालुक्यातील चादेश्वेरी येथील धबधब्याच्या पाण्यात एका तरुणांचा बुडूनमृत्यू झाला. किशोर बारगळ(३०)असे या तरुणांचे नाव आहे.
चादेश्वेरी(कासारी) येथे दर्शनासाठी पोखरी ता.वैजापूर येथून सहा मित्रांचा समूह शनिवारी दुपारी येथे आला होता. या ठिकाणी असलेला धबधबा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू आहे. किशोर दादासाहेब बारगळ (३०) व त्यांचे सहकारी या धबधब्याच्या खाली पाण्यात पोहण्यासाठी उतरले.
पोहत असतांना किशोर यांस पाण्याचा अदांज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न त्याच्या मित्रांनी केला परंतु तो पाण्यात बुडाला. यावेळी पोलिसांना कळविण्यात आले तात्काळ पोलिस निरीक्षक संतोष मटकुळे, रमेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चादोरी ता.निफाड येथील पाण्यात पडलेल्या मुलांना काढणाऱ्या टिमला पाचारण करण्यात आले.तब्बल सहा तासानंतर किशोरचा मृतदेह आढळून आला.
चादेश्वेरी येथील धबधब्याची भौगोलिक रचना माहित नसल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. परिणामी पर्यटक पाण्यात उतरतात आणि बुडतात.
याबाबत नांदगाव पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो.ह.आर. व्ही. पवार हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here