
सिल्लोड ( प्रतिनिधी – विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसापासून झालेल्या मुसळदार पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.या मध्ये कपाशी,मक्का,सोयाबीन,इ.पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.दिनांक २७ जुलै रोजी नायब ताशीलदार यांना कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले.या नेवेदनामध्ये म्हंटले आहे की,झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून याचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.व तसेच कॉरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिकविमा भरण्यासाठी ऑगस्ट २०२० पर्यंत मुदत वाढ करून दयावी,बाजारात शेतकऱ्यांना युरिया खताचा तुटवडा आहे.तरी ताबोडतोबा खत उपलब्ध करून घ्यावे.व होणार काळा बाजार थांबावा.अशी ही मंगणी कृषी पदवीधर युवाशक्ती संघघटनेच्या औरंगाबाद विध्यार्थी जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश राऊत यांच्या अध्यक्षखाली सिल्लोड नायब तहसिलदार के.जि. कुलकर्णी साहेब यांना निवेदन देण्यात आले.या वेळी किरण सोमासे,अजय जंजाळ,शुभम थोरात आधीची उपस्थिती होती…
