जीवदान देणा-या युवकाचा सिल्लोड ग्रामीण पोलीसांच्या वतीने सत्कार

0

सिल्लोड ( प्रतिनिधी -विनोद हिंगमीरे ) मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरूवात झालेली असुन पावसाने सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.पावसामुळे अंधारी येथील गावालगत असलेली नदी दुथडी भरून वाहत होती अशातच अंधारी येथील युवकाने पाण्याचा अंदाज न घेता पोहण्याच्या उद्देशाने पुराच्या पाण्यात उडी घेतली परंतु पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने सदरील युवक पाण्यात बुडण्यास सुरूवात झाली.यावेळी नदीकाठी मोठ्या प्रमाणात बघ्याची गर्दी जमा झाली.परंतु आपल्या जीवाची पर्वा न करता तेथे असलेला तरूण अक्षय विध्वंस व नवनाथ तायडे यांनी पुराच्या पाण्यात उडी घेऊन पाण्यात बुडणा-या युवकाचा मृत्युच्या प्रवाहातुन बाहेर काढले व जीवदान दिले.अक्षय विध्वंस व नवनाथ तायडे यांचे तरुणाला वाचवतांनाचे व्हीडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
सदरील तरुणांच्या कौतुकास्पद व बहादुरीच्या कार्याची दखल घेऊन औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण येथे अक्षय विध्वंस व नवनाथ तायडे यांचा सत्कार कार्यक्रमाचे नियोजन करून त्यांचा सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार मूर्ती तरूणांना मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन मुंढे व सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री किरण बिडवे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.
सत्कार कार्यक्रमाच्या वेळी
सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री विकास आडे,पोलीस कर्मचारी श्री विष्णू पल्हाळ व इतर पोलीस कर्मचारी यांच्यासह अंधारी येथील पोलीस पाटील, शिक्षक तायडे हे हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here