
सिल्लोड ( प्रतिनिधी -विनोद हिंगमीरे ) सिल्लोड ते कन्नड या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ठ झाल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडियरचे तालुका अध्यक्ष विजय पवार यांनी तहसिलदार यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे.पवार यांनी आपल्या तक्रारीत नमुद केले आहे की सदरील रोडवर डांबरीकरणाचे काम सुरू असुन पुढे काम मागे खड्डे पडण्यास सुरुवात झालेली आहे.सदरील काम बोगस पद्धतीने सुरू असुन पावसाळा सुरू असल्यामुळे खड्यात पाणी साचून अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे.यामुळे संबंधित रोडच्या कामात लक्ष घालुन या रोडचे सुरू असलेले बोगस काम तत्काळ थांबवावे व संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर आपण योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्याकडुन आम्हाला या कामाचे इस्टीमेट,शेड्युल बी,वर्कऑर्डर,संबंधित ठेकेदाराचे नाव अशा प्रकारची माहीती देण्याची सुचना करावी अन्यथा संभाजी ब्रीगेडच्या वतीने तीव्र आंदोलन,रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रीगेडचे तालुका अध्यक्ष विजय पवार यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केलेले आहे.
