सिल्लोड तालुकाध्यक्षपदी नानासाहेब गायकवाड तर युवक तालुका अध्यक्षपदी बाबुराव आहिरे यांची निवड

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमिरे )

सिल्लोड तालुक्यामध्ये सिल्लोड शहरासह ग्रामीण भागात साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमीत्त अण्णाभाऊ साठे यांचे वारसदार(नातु) श्री सचिनभाऊ साठे यांनी लोकशाहीर साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार व लिखान समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने तसेच मानवहीत लोकशाही पक्षाचे संघटन मजबुत करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात मानवहीत लोकशाही पक्षाच्या कार्यकारिणीची निवड प्रकीया सुरू केलेली आहे.
मानवहीत लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री.सचिनभाऊ साठे यांच्या आदेशावरून तसेच प्रदेशाध्यक्ष श्री.राधाकृष्णजी साठे तसेच श्री.भागवत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष श्री रमेशभाऊ सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीर साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यांने प्रेरीत असलेले तसेच श्री सचिनभाऊ साठे यांचे समर्थक म्हणुन सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब गायकवाड यांची सिल्लोड तालुकाध्यक्षपदी तर बाबुराव चिंतामण आहिरे (कासोद) यांची सिल्लोड युवक तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.यावेळी नानासाहेब गायकवाड व बाबुराव आहीरे यांची निवड झाल्याबद्दल मिञ परिवार, समाजबांधव तसेच सोशल मिडीयाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here