मालेगाव -२७/०७/२०२० महामार्गावरील मालवाहु ट्रक ड्रायव्हरांना मारहण करून ट्रक हायजॅक करणारे टोळीतील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केले जेरबंद – तपासात २३ लाखाचा माल हस्तगत दिनांक २० जुलै २०२० रोजी नाशिक ते पेठ जाणारे गुजरात महामार्गावर रासेगाव शिवारात बारासाखळा डोंगराजवळ रात्रीचे सुमारास मालवाहु ट्रक क्र . के.ए.५६-१९ ४५ वरील चालक नामे अनिलकुमार बॅनर्जी , रा.संगवळणी , जि.बिदर , राज्य कर्नाटक यास अज्ञात आरोपीतांनी त्यांचेकडील एक सफेद रंगाची कार आडवी मारून त्यास व क्लिनरला गाडीचे कॅबीनमधुन खाली ओढुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मालट्रक हायजॅक केला व ट्रकमधील कॉटनचा माल व अशोक लेलंड कंपनीची ट्रक असा एकुण २६ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने लुटमार करून नेलेबाबत दिंडोरी पोलीस ठाणेस । गुन्हा रजि.नंबर १५३/२०२० भादवि कलम ३ ९ २,३४१,३२३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या मा.पोलीस अधीक्षक डॉ . आरती सिंह मॅडम यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . के.के.पाटील यांचे पथकाने जिल्हयातील महामार्गावरील गुन्हे करणारे गुन्हेगारांची गोपनीय माहिती घेवुन वरील गुन्हयाचा समांतर तपास सुरू केला . सदर गुन्हयातील आरोपींचे गुन्हा करण्याचे पध्दतीवरून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हेगार हे मालेगाव शहर परिसरातील असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली . त्याप्रमाणे मालेगाव शहरातील देवीचा मळा परिसरात सापळा रचुन संशयीत नामे अजहर खान वाजीद खान उर्फ अज्जु , वय ३० , रा . उमराबाग , देवीचा मळा , मालेगाव यास शिताफिने ताब्यात घेतले . त्यास विश्वासात घेवुन वरील गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने त्याचे मालेगाव शहरातील इतर ०४ साथीदारांसह दिनांक २० जुलै रोजी नाशिक ते पेठ जाणारे महामार्गावर त्यांचेकडील सफेद रंगाची टोयोटा ईटिऑस कार एका मालट्रकला आडवी मारून ट्रकवरील चालक व क्लिनरला मारहाण करून ट्रक हायजॅक करून तिचेतील मालासह जबरीने चोरी करून नेल्याची कबुली दिली आहे . सदर आरोपी नामे अजहर खान उर्फ अज्जु यास अधिक विचारपुस केली असता , त्याने त्याचे साथीदारांसह मालेगाव शहरातुन टोयोटा ईटिऑस कार भाडयाने घेवुन गुजरात महामार्गावर रासेगाव , ता.दिंडोरी शिवारात मालवाहु ट्रक क्र . के.ए.५६-१९ ४५ चा पाठलाग करून चालक व क्लिनरला मारहाण करून मालासह ट्रक ताब्यात घेवुन ट्रकमधील कॉटनचा माल विक्री केलेला आहे . आरोपी अजहर खान व त्याचे इतर साथीदारांनी मिळुन गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर मालट्रक हायजॅक करून गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असुन दिंडोरी , देवळा व कसारा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल जबरी लुटमारीचे ०३ गुन्हे उघडकीस आलेले आलेले आहे . सदर आरोपीने गुन्हयात वापरलेली टोयोटा ईटिऑस कार क . एम.एच.०३.बी.ई. ०३८२ ही हस्तगत करण्यात आली असुन चोरून नेलेली मालट्रक क्र . के.ए.५६-१९ ४५ ही मुंबई आग्रा महामार्गावर झोडगे शिवारात जप्त करण्यात आलेली आहे . तसेच सदर मालट्रक मधील १५ लाख रूपये किंमतीचे ४० ९ कॉटनचे बंडल व मालट्रक असा एकुण सुमारे २३ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे . आरोपी अजहर खान याचे इतर साथीदारांचा स्थागुशाचे पथक व दिंडोरी पोलीस ठाणेकडील अधिकारी व कर्मचारी कसोशिने शोध घेत आहेत . सदर आरोपी हे महामार्गावरील गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेकडुन अजुन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे . नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या मा.पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह मॅडम , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर मॅडम , उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग श्री.सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री . के.के.पाटील , दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोनि श्री . अनिल बोरसे , सपोनि संदिप दुनगहु , सपोनि स्वप्निल राजपुत , पोउनि कल्पेशकुमार चव्हाण , सपोउनि रामभाउ मुंढे , पोहवा दिपक आहिरे , पुंडलिक राउत , दत्तात्रय साबळे , गणेश वराडे , नामदेव खैरणार , वसंत महाले , सुहास छत्रे , पोना प्रविण सानप , अमोल घुगे , विश्वनाथ काकड , वसंत खांडवी , हेमंत गिलबिले , चेतन संवत्सरकर , राकेश उबाळे , पोकॉ फिरोज पठाण , प्रदिप बहिरम यांचे पथकाने जबरी लुटमारीचे गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी केली आहे .
Home Breaking News महामार्गावरील मालवाहु ट्रक ड्रायव्हरांना मारहण करून ट्रक हायजॅक करणारे टोळीतील गुन्हेगारास स्थानिक...