स्वराज्य युवा संघटना सिल्लोड च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले निवेदन

0

सिल्लोड ( प्रतिनिधी – विनोद हिंगमीरे) हिंदवी स्वराज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती उदयनराजे यांच्या जय भवानी जय शिवराय घोषणेवर तिरस्कार आत्मक विधान करून छत्रपती उदयनराजे व लाखो शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यात संतप्त निर्माण झाला आहे तसेच जागोजागी राज्यसभेचे सभापती व नायडू यांचा जाहीरपणे निषेध नोंदविला जात आहे तरी त्यांनी लवकरात लवकर समस्त शिवभक्तांची माफी मागावी नसता निषेध धनाचे वळण आंदोलनाच्या दिशेने जाईल असा इशारा देण्यात आला आहे. स्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष राहुल आवटे यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शहानवाज खान हाजी इब्राहिम खान गजानन सुरडकर तालुकाध्यक्ष. शंकर मानकर तालुका उपाध्यक्ष. सागर कुदळ तालुका सचिव. शकील पठाण तालुका कोषाध्यक्ष. साजिद खान शहराध्यक्ष. संदीप ढोरमारे शहर उपाध्यक्ष. शेख रियाज शहर कोषाध्यक्ष. हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here