डिग्रस येथील रहीवासी भोगताहेत रस्त्याअभावी नरक यातना

0

पाच वर्षापासून करत आहेत पायपीट,अनेक वर्षापासुन या रस्त्यावरील चारचाकी वाहने झाली बंद,बस अभावी विद्यार्थ्यांचे हाल,

सिल्लोड ( प्रतिनिधी -विनोद हिंगमीरे)

डिग्रस-शिवना डांबरीकरण रस्ता उखडल्याने डिग्रस सह वाड़ी शेतवस्तीवरील ग्रामस्थांची गेली सात वर्षांपासून पायपीट सुरु आहे,सात किलोमीटर रस्तावर प्रवास करताना चक्क हजारो खड्डे तुडवावी लागतात व हे सात किलोमीटरचा रस्ता सत्ताविस किमी चा हेलपाटा घेऊन पार करावा लागते तो असा डिग्रस-शिवना हे अंतर अवघे सात किमी आहे,मात्र या रस्त्यावरुण वाहने बंद झाल्याने ग्रामस्थांना शिवना-गोळेगाव-डिग्रस फाटा -डिग्रस असा सत्ताविस किमी प्रवास करावा लागत आहे.या लांब पल्याच्या मार्गामुळे विद्यार्थ्यांचे व रूग्णांचे प्रचंड हाल होत असून अतिरिक्त आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
डिग्रस येथील ग्रामस्थांना रस्त्याअभावी एकविसाव्या शतकातही नरकयातना सहन कराव्या लागत असल्याचे हे वास्तव आहे. डिग्रस येथील ग्रामस्थांची शिवन्याच्या बाजारपेठेशी एक नाळ जुळलेली आहे.त्यामुळे विद्यार्थांच्या शिक्षणापासून ते किराणा वस्तु खरेदीसाठी येथील ग्रामस्थाना शिवना येथे जावे लागते.शिवना येथील अनेक कुटुंब शेती व्यवसायानिमित्त याच मार्गावर डिग्रस पर्यंत स्थलांतरित  झालेले आहेत.त्यामुळे हा भाग शिवन्याचा हिस्सा म्हणून ओळखला जातो.यापूर्वी दिवंगत माजी आमदार किसनरावजी काळे यांच्या कार्यकाळात या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण झाले होते.आज गेली सतरा वर्षे या कामाकडे संबधित विभागाकडून दुर्लक्ष झाले आहे.हा रस्ता पूर्णपणे उखडला असताना दुरुस्तीसाठीही फारसे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही.त्यामुळे एसटी मंडळाची बस व खाजगी चारचाकी वाहने पाच वर्षापासून या रस्त्यावर धावलेली नसुन पुर्ण बंद आहे.डिग्रस येथून तब्बल पन्नसावर विद्यार्थी शिवन्याच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी ये जा करत.मात्र चार वर्षापुर्वी या रास्त्यावरुण एसटी महामंडळाची बससेवा खराब रस्त्याअभावी बंद झाली असल्याने डिग्रस येथील एकही विद्यार्थी शाळेला येत नाही.खासगी वाहने चालविने अवघड होत असल्याने रुग्णांना शिवन्याएवजी सिल्लोडला भरती करावे लागत आहे.अशी विध्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निलेश काळे यांच्या वतीने लेखी निवेदनाव्दारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता सिल्लोड यांना देण्यात आले.
निलेश काळे: -विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गेल्या अनेक दिवसां पासून मोठे भगदाड पडल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षा मुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. लवकरात लवकर डागडुजी करावी अन्यथा विद्यार्थी काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्व जबाबदारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here