वांगी बुद्रुक गावाला लागुन असलेल्या पुलाचा अर्धा भाग गेला वाहुन

0

सिल्लोड( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) मागील पाच ते सहा दिवसापासुन सिल्लोड तालुक्यासह भराडी परिसरात दमदार पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने सर्वच नदी,नाले,धरण,तळे मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो झाले असुन पावसामुळे शेतातील पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.तालुक्यातील वांगी बुद्रुक गावाजवळील नदीवर पुल असुन सदरील पुल वांगी बुद्रुक ते मोढा या दोन गावांना जोडणारा पुल आहे.परंतु मागील चार ते पाच दिवसापासुन मुसळधार पाऊस पडत असल्याने सदरील नदी दुथडी भरून वाहत आहे.सदरील पुलाची उंची कमी असुन त्यामध्ये सिमेंटचे पाईपही कमी प्रमाणात टाकण्यात आलेले आहे.नदीला पुराचे पाणी आल्यानंतर सुरुवातीची सर्व घाण सिमेंट टाक्यामध्ये जमा होते यामुळे काही वेळातच पाणी पुलावरून वाहण्यास सुरूवात होते.सदरील नदीला दुथडी भरून पुराचे पाणी आल्यामुळे पुलाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग वाहुन गेला आहे.यामुळे या पुलावरून जातांना पुल तुटण्याची भिती नागरिकांत निर्माण झालेली आहे. वांगी बुद्रुक येथील शेतक-यांच्या मोढा शिवारात शेतजमीनी असुन तेथे खताची वाहतुक करण्यासाठी वाहन घेऊन जाणे अवघड होऊन बसले आहे.तलाठी काशीनाथ ताठे यांनी वांगी बुद्रुक गावाला शनिवार रोजी भेट देऊन गावचे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांच्याकडून गावातील नुकसानीबाबत माहीती जाणुन घेतली.तसेच गावक-यांच्या आग्रहावरून खचलेल्या पुलाची पाहणी केली परंतु सदरील पुलाच्या दुरूस्तीचे काम किंवा पंचनामा करण्याचे काम आमच्या विभागाचे नसुन संबंधित विभागाकडे दुरूस्तीच्या कामाची मागणी करण्याचे सांगितले.
तरी संबंधीत विभागाने सदरील पुलाची पाहणी करून तत्काळ पंचनामा करावा अशी मागणी वांगी बुद्रुक येथील गावक-यांकडुन होत आहे.यावेळी अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे जे काही नुकसान झाले आहे त्यासंदर्भात शासनाकडून आदेश आल्यानंतर त्वरीत पंचनामे सुरू करणार असल्याचे त्यांनी शेतक-यांना सांगितले.यादरम्यान शेतक-यांनी ३१ जुलैच्या अगोदर आपण जे पिक पेरलेले आहे त्याच पिकांची ई पिक पाहणी अॅपवरून माहीती भरून पिक विमा भरून घ्यावा जेणेकरून अतिवृष्टीमुळे पिकांचे काही नुकसान झाल्यास शेतकरी नुकसान भरपाई पासुन वंचित राहणार नाही असे तलाठी काशिनाथ ताठे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here