अंभई-रेलगाव रस्त्यावरील केळणा नदीवरील पुलाच्या सुरवातीलाच पडलेला मोठा खड्डा

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) अंभई-रेलगाव ह्या रस्त्यावरील केळणा नदीवरील पुलाची दुरावस्था झाली असून पुलावरील स्लॅबवर  टाकलेला सिमेंट वाळूखडीचा गिलावा पावसाळा सुरू झाल्यापासून नदीला अनेकवेळा आलेल्या पुरामुळे जागोजागी वाहून गेला आहे.त्यामुळे पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत.तशेच पुल व रस्ता जोडणारा भराव वाहून गेल्यामुळे पुलाच्या सुरवातीला मोठा खड्डा पडला आहे.ह्या खड्ड्यातुन वाहने चालविणे मोठया कसरतीचे काम झाले आहे.पुलाची उंची कमी असल्यामुळे नदीला पूर आल्यास पुला वरून पाणी वाहते.त्यामुळे वाहतूक ठप्प होते.यावर्षी परिसरात सतत मोठमोठे पाऊस पडत  असल्यामुळे अनेक वेळा नदीला पूर आल्यामुळे  पुलावरून होणारी वाहतूक अनेक वेळा ठप्प झाली आहे.अंभई सर्कल मधील रेलगाव हे मोठे गाव असून ह्या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते.अंभई रेलगाव ह्या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर केळणा नदीवर असलेल्या ह्या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here