केळगाव येथील केळणा नदिवरवरील पुलाचे भाग्य केव्हा उजाळणार पुल बनला धोकादायक

0

सिल्लोड ( प्रतीनिधी :-विनोद हिंगमिरे ) सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील केळणा नदीवरील पुल धोकादायक बनला असून पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर त्यांची तत्काळ नविन पुल करण्यात यावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे गेल्या आठवड्यापासुन पाऊस सुरु आहे पाऊस सुरु असल्यामुळे उंची कमी असल्याने तीन ते चार वाहतुक दोन्ही बाजुंनी ठप्प राहते हा पुल धोकादायक असल्यामुळे वाहनधारक चालकाना ठप्प राहावे लागते जोरदार पाऊस झाला तर तो कोसळु शकतो एखाद्या वेळेस पुल कोसळला तर हानी होऊ शकते हा जर पुल कोसळला तर अनेक गावांचा संपर्क तुटणार आहे आधरवाडी,कोल्हाळा,तांडा या गावाकडुन नदी वाहते पुलाच्या दोन्ही बाजुचे संरक्षण कठडे वाहून गेले आहे हा पूल धोकायक झाला आहे नदीला पूर आल्यावर चार गावाचा संपर्क होत आहे या पुलाच्या ठिकठिकाणी मोठी भगदाडे पडली आहेत मात्र या पुलाची दयनीय अवस्था झाली आहे वर्षेदोन वर्षात याची डागडुगी होऊन थातुरमातुर दुरुस्ती केली जाते.पावसाळ्यात हा पुल पुन्हा जैसे थेच होऊन जातो संबंधित कंत्राटदार बिले काढुन मोकळे होतात मात्र यांचा वाहनधारक तसेच पदचार्‍यांना सोसावा लागतो असे असूनही प्रशासन या पुलाविषयी गाढ झोपलेले आढळुन येते केळगावकराना जाण्यासाठी हा आमठाणा रोडवरील मुख्य पुल आहेत केळगाव येथील जाण्यासाठी याच पुलावरुन जावे लागते
येथील केळणा नदिवरील पुल खचला आहे या पुलाची एक वर्षापुर्वी उन्हाळ्यात मुरुम टाकुन थातुर मातुर दुरुस्ती करण्यात आली होती कित्येक वर्षापासुन नविन पुल उभारण्याची व उंची वाढवण्याची मागणी आहे सिल्लोड तालुक्यातील प्रसिध्द मुडैश्वर देवस्थान जाण्यासाठी जाणारा हा मुख्य रस्ता आहे या पुलावरुन 4ते5 गावांचा सपर्क असताना देखील या पुलाची उंची वाढण्यासाठी नविन पुल उभरण्यासाठी केवळ आश्वासने देण्यात येत आहे
या पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात वाहतुक तास न तास वाहतुक ठप्प राहते नविन पुल करावा अशी मागणी नागरीकातुन होत आहे.
केळगाव आमठाणा रस्त्यावरील केळगाव गावाजवळील पुलाची उंची ही कमी असल्यामुळे थोडा जरी पाऊस झाला की लगेच या पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते व तासनतास वाहतूक ठप्प होते गेल्या कित्येक दिवसापासून केळगाव येथील ग्रामस्थांनी फुला संबंधीत बांधकाम विभागाकडे मागणी केलेले आहेत परंतु नेतेमंडळी व शासकीय अधिकारी हे मात्र याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचं केळगाव येथील ग्रामस्थांनी सांगितले आज शुक्रवार रोजी झालेल्या या मुसळधार पावसाने केळगाव आमठाणा रस्त्यावरील पुलाला पूर आल्यामुळे जवळ जवळ दोन ते तीन तास वाहतूक ठप्प होते परंतु तरीसुद्धा पावसाचा जोर हा वाढतच असल्याने पुलाचे पाणी हे कमी न होता हे वाढतच होते.

सा.बा.विभागाचे याकडे दुर्लक्ष
या पुलाची दुरवस्थेकडे सा.बा.विभाग तथा लोकप्रतिनिधी तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी तथा प्रशासनातील सर्व अधिकायांचे दुर्लक्ष होत आहे परिणामी वाहनचालकासह पादचार्‍यांना जीव धोक्यात घालून पुलावरील जावा लागते केळगाव येथील श्री.क्षेत्र मुडेश्वर येथे दर्शनासाठी नेहमी भाविकाची वर्दळ राहते रिमझिम तरी पाऊला आला की पुलावरुन पाणी वाह्याला सुरुवात होते पुलाची उंची वाढवावी अशी मागणी वाहनधारकांनी केली आहेत.केळगाव गावाजवळील हा पूल आहे मुर्डेश्वर ला जाण्यासाठी याच पुलावरून जावे लागते गावाला लागून मोठया डोगर दऱ्या आहेत त्यामुळे या नदीला मोठा पूर येतो या पुलाची अवस्था व पुलाला उंची नसल्यामुळे शाळकरी मुलांना व भाविक भक्तांना तासनतास नदीला पूर आल्या नंतर थांबावे लागते या पुलाचे काम करण्यात यावे अशी मागणी आम्ही ग्रामस्थनी खूप वेळा केली पण बांधकाम विभागाचे या कडे दुर्लक्ष होत आहे विभागाने काही जीवित हानी होण्या अगोदर पुलाचे काम पूर्ण करावे.विकास पा.मुळे भा.ज.पा.तालुका उपअध्यक्ष सिल्लोडहा जो केळगाव आमठाणा रोडवरील पुल धोकादायक झाला आहे मलमावर पटी लावतो जशी डागडुगी झाली होती.या पुलावरील ताराचा सळ्या उघड्या पडल्या देखील आहे याकडे दुर्लक्ष होत आहे या पुलावर खड्डेच खड्डे आहे खड्डयात पाणी साचले की खड्याचा अंदाज कळत नाहि जास्त स्वरुपाचा पाऊस पडल्यास खड्यात पाणी साचते गावाला लागून मोठया डोगर दऱ्या आहेत त्यामुळे या नदीला मोठा पूर येतो पूर आला की वाहतूक ठप्प राहते या पुलाची थयनीय अवस्था झाली आहे
संजय जैन ग्रामस्थ केळगावकेळगाव येथील केळणा नदीवरील पुल धोकादायक झाला आहे या पुलावरील ताराचा सळ्या अशा प्रकारे उघड्या पडल्या गेल्या आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here