मा आदरणीय श्री मनोज भाई संसारे साहेब
अध्यक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन यूथ
महाराष्ट्र
आणि
आमचे आदरणीय भाई
भाई,,
माझे आवडते (डोळस पट्टू ) राजू देठे च्या आजारपणात आपण आवर्जून उभे राहिलात अन मग कळाले हे सर्व मुले भाई चे नाव दरवेळी अन प्रेतेक वेळी का घेत राहतात, आपल्याला नेता महणून आम्ही आपण माझ्या वडिलांना वि टी च्या रेल्वे ऑफिसमध्ये, माझ्या वडिलांना भेटायचे तेव्हापासून १९८० पासून बघतोय,
आपलेसामाजिक जाणीवपूर्वक धडपडणाऱ्या वृत्तीच नेहमीचं कौतुक वाटत होते, तो काळ चळवळीचा पेपर नवकाळ, मूनसिपल भिंतीच्या भोवतीच्या रंगरांगोटी अन बेनेर असून सुद्धा आपल्या हाकेव्हर शंभर दीडशे मुले उभी राहत , आजही परिस्थिती काही वेगळी नाही पण आपली कामाची धडक अन तडफड उठून दिसते,
भाई,
१९८७ असेल कसल्यातरी वादातून माटुंग्याच्या लेबर कॅम्प च्या बाहेर च्या इराणी हॉटेल समोर बाचाबाची झाली, आणि प्रकरण पेटणार असे दिसताच आपल्या कानांवर कशी बातमी गेली आणि आपण थोड्याच वेळात टॅक्सीने तिथे हजर झालात ,अपोझिट पार्टीने गपचुप नमते घेतले अन इराण्याकडे बनपाव अन चहा पाजुन पाठवले,
मी सुद्धा तो चहा अन बनपाव खाला होते म्हणून जास्त ध्यानांत राहीले,
भाई,
जाऊ नये त्या वयात मा श्री राजू देठे गेले, नुकताच कोरोन लोकडवून सुरू झाला होता, हाताच्या बोटावर असणारी कलाकारांची कमाई रोज संपते आणि बचत टाकली तरी खाऊन पूरेल असे नसते हे आपल्यासारखे जाणकार नेते ओळखतात, राजू देठे याचे बील अवाच्या सवा आल्यावर कलाकारांची हालाखीची परिस्थिती जाणुन आपणा दिवसभर हॉस्पिटलमध्ये जातीने उभे होते नाहीतर आर्थीक मदत सुध्दा केली, बाकीचे सर्व पंचू दादा, शिश्रीन कम्बले, जस्सी, प्रवीण कदम, अन बरच जण आपल्या भोवतीच्या रडवेला चेहार्यने आशेने आपक्याकडे आधार म्हणून बघत होते,
भाई
आपण जाणतात की, कलाकार रोज उभा राहतो अन रोजचा दिवस नवा असतो, ज्याचे चालते त्याचे चालते नाहीतर बाकीचे हातांवर तोकडे अन तुटपुजे पैसे कमात्वात, रोजचा घरचा खर्च, घराची जवाबदारी, अंगावरचे देणे, आणि मनाची ताण तणावग्रस्त अशी अवस्थेत काम करताना लोकांना वाटते की आम्ही सारखेच हसतमुखाने उभे राहावे,
उद्या घरचे भाडे भरावे कसे,,,??हा विचार असतो अन कामात उभे रहावे लागते,
भाई,
चार महिन्यांत सर्व जण सर्व जागी छोटा मोठा काम पकडून उभे आहे, बाकीचे सर्व आपल्याला ऐक विनंती करित आहे की लोकदावून जरी संपला तरी ज्या कार्यक्रमात गर्दी होतें ते कार्यक्रम बंद रहातील, मग कलाकारांना काम नाहीच,
भाई
जगणे कठीण होईल,,
भाई
आपण मुख्यमंत्र्यांना निवेदनात काही बाबी खुल्या करुन 200 लोकांची गर्दी चालेल अशी गर्दी झाली अश्या कार्यक्रमात कलाकारांना संधि दयावी अन्यथा थोडे मानधन जयचे वय५० च्या वर आहे त्यानं चालू करावे ही विनंती
भाई
आपला आधार वाटतो
अन
तो किती सार्थ आहे हे आपण वेळोवेळी दाखवलेल्या उबदार सकारात्मक सहकार्य वरुण जाणवले आहे,
आजच्या दिवशी परत आपल्याला हे सर्व लिहिताण राजू देठे नजरेसमोर उभा आहे असे वाटते
भाई
परत भेटू
आपला
डॉ राजेंद्र क्षीरसागर
(भाई आपला कार्यकर्ते)
खारघर
९०२२०४०३३७