वादळी वाऱ्यासह झाले पिकाचे नुकसान

0

नांदगाव (  प्रतिनिधी- निखिल मोरेे ) तालुक्यातील टाकळी, बाणगांव,खिर्डी दहेगांव ,मोरझर या भागात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे खरीपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
नांदगाव तालुक्यातील टाकळी, बाणगांव,खिर्डी, दहेगांव मोरझर,माणिपुंज ,पोखरी व परिसरात गुरुवारी (दि.२३) रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने खरीपाचे ज्वारी, मका, बाजरी, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.या नुकसानग्रस्त पिकांचे ताबडतोब कृषी विभाग व महसूल विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाल्मिक निकम,
ज्ञानेश्वर गायकवाड,शंकर गायकवाड,इंदूबाई अशोक,
सजन कवडे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here