नांदगाव शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांंवर दंडात्मक कारवाई

0

नांदगाव (  प्रतिनिधी -निखील मोरे ) नांदगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नांदगाव शहरात नागरिक मास्क न वापरणे व सुरक्षित अंतर न ठेवणे. यासाठी नगरपरिषदेकडून कठोर कारवाई सुरू आहे. शहरातील सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्या पाच दुकानदारांवर सीलबंद कारवाई करण्यात आले असून मास्क न लावणाऱ्या 69 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती डॉ. श्रीया देवचके यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी सोपान कासार,पोलीस उपविभागीय अधिकारी समीरसिंग साळवे,तहसीलदार उदय कुलकर्णी,पोलिस निरीक्षक संतोष मटकुळे, मुख्यधिकारी डॉ. श्रीया देवचके यांनी नांदगाव शहरांंची पाहणी केली. शहरातील दुकानांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, मास्क वापर न करणे, सनिटॉझरचा वापर न करणे हे निर्दशानास आले.शहरात प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी शासनाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात यावे, तसेच शहरातील गांधीचौक, शनीमंदिर,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील फुटपाथवरील व्यवसायिकांना तात्पुरते दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावे, अशा सुचना उपविभागीय अधिकारी कासार यांनी मुख्यधिकारी डॉ. देवचके यांना देण्यात आल्या आहेत.नांदगाव शहरात कोराना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नगरपरिषदे कडून उपाययोजना करण्यात येत आहे.नांदगाव शहरात विना मास्क फिरणाऱ्या 69 नागरिकांंवर 15,हजार 600रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्या 5 दुकानदारांंवर सीलबंद कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here