ब्रम्ह कमळाच्या उमलेल्या फुलांनी श्रावण महिन्याचे केले स्वागत….

0

मनमाड – पावसाळ ऋतूतील सर्वात रमणीय महिना म्हणजे श्रावण मास , श्रावण महिन्यात निसर्गाचे आणि वेगवेगळ्या वनस्पतींचे सुंदर रुप बघायला मिळते.अशीच एक पावसाळ्यात आपले लोभणीय रूप दाखवणारी वनस्पती म्हणजे ब्रह्म कमळ.मूळची मध्य अमेरिकेतील असणारी कॉकटेस्ट कुळातील आहे , या वनस्पती चे शास्त्रीय नाव एपिफायलमऑक्सिपॅटिलोम हे असून भारतात ती ब्रह्म कमळ या नावाने ओळखली जाते.
पानासारख्या दिसणाऱ्या खोडावर पावसाळ्यात मोठी ,सुंदर ,पांढरी , सुगंधी व एकेकाटी फुले येतात.ही फुले रात्री येतात आणि सुर्योदयापूर्वी मावळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here