कोरोनाची अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई करा -जगदीश भिका खरे

0

कळवण  ( प्रतिनिधी – महेश कुवर ) कळवण तालुक्यातील देसराणे येथे एका कुंटूबियांच्या विरोधात अज्ञात व्यक्तीने करोना संदर्भात चुकीची माहीती देऊन अफवा पसरविल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार  भारतीय मानवाधिकार परीषदचे कळवण तालुकाध्यक्ष जगदीश खरे यांनी पोलिस निरीक्षक प्रमोद  वाघ यांच्याकडे केली आहे . याबाबत सविस्तर वृत असे की , तालुक्यातील देसराणे येथे एक वयोवृद्ध दाम्पत्य त्यांच्या कुंटूबिंया समवेत राहत असुन , त्यांचे गावातच किराणा दुकान आहे . त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह असुन , दि .२२ . जुन रोजी नासिक येथे  दोघे वयोवृद्ध दाम्पत्य लग्न समारंभासाठी गेले होते . लग्न आटोपून दि .२५ रोजी त्यांच्या मुळगावी देसराणे येथे ते परतले. त्या दरम्यान त्यांना करोनाचे लक्षणे आढळल्याने त्यांना तात्काळ कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैधकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वॅबचे नमुने घेऊन तपासणी साठी वरीष्ठ स्तरावर पाठवले . त्यानंतर दी .११ जुलै रोजी  त्यांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याने ते दोघे वयोवृध्द दाम्पत्य निगेटीव्ह असल्याचे निदर्शनास आले .पंरतू त्यांच्या बाबत काही अज्ञात व्यक्तींने देसराणे सह ईन्शी , नाळीद , रवळजी , मोकभणगी , भांडणे , गणोरे .आदी गावांमध्ये वरील दाम्पत्याच्या विरोधात  चुकीची माहीती देऊन संबधीत वयोवृद्ध  दाम्पत्य करोना पॉझिटीव्ह असल्याची अफवा पसरवली. त्यामुळे त्यांचे दैंनदीन जिवन पुर्णतः विस्कळीत झाले असुन , त्याचा दुष्परीणाम त्यांच्या कीराणा दुकानावर झाला असुन त्यांचा उदरनिर्वाहचा प्रश्न उपस्थीत झाला आहे . त्यामुळे चुकीची अफवा पसरविणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा तपास करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय . मानवाधिकार परीषदेचे तालुकाध्यक्ष जगदीश खरे यांनी लेखी अर्जात केली आहे.
…………………………………………………………..
करोना विषाणू संदर्भात परीसरात चुकीची अफवा अज्ञात व्यक्तीने पसरवली आहे . याबाबत स्थानिक ग्रामपंचायत विभाग , प्राथमिक आरोग्य केंद्राने जनजागृती करून वयोवृद्ध दाम्पत्या बद्दल गैरसमज दुर करावा
-जगदीश भिका खरे
तालुकाध्यक्ष
भारतीय मानवाधिकार परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here