महाराष्ट्र रक्षक ग्रुप च्या महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया पदी सतीश सिंग परदेशी यांची निवड

0

मनमाड – महाराष्ट्र रक्षक ग्रुपची तातडीची  बैठक आज मनमाड येथे पार पडली यावेळी अनेक महत्वाचे विषय घेण्यात आले तर कार्यकारनीची निवड करण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व गोरगरीब जनतेसाठी अत्यावश्यक सेवा तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा हात देत आहे.या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हे,तालुके शहर अशा ठिकाणी महाराष्ट्र रक्षक ग्रुपचे सदस्य व पदाधिकारी नेमणूक करणे व शासन प्रशासनाला आपल्या पदाधिकारी कडून किंवा सदस्यांकडून जेवढी मदत करता येईल हा महाराष्ट्र रक्षक ग्रुपचा सर्वात मोठा उपक्रम असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून सामाजिक कार्यात मध्ये असणारे तसेच  पत्रकारिता मध्ये असणारे सतीश सिंग परदेशी सदैव गोरगरीब जनतेचे प्रश्न असो किंवा काही काम असो अशा सर्व नागरिकांना मदत करणारे तसेच  गौ रक्षाचे व सामाजिक  राजकीय   सर्व ठिकाणी  आवर्जून उपस्थितीत कार्य करणारे सतीश सिंग परदेशी यांना महाराष्ट्र रक्षक ग्रुप चे संस्थापक प्रवीण राजपूत यांच्या आदेशाने तसेच सुभेदार गोविंदा बागुल एरंडोल बस स्थानक प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश सिंग परदेशी यांना महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख म्हणून शपथ पत्र नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी हवालदार आबासाहेब गरुड चाळीसगाव राष्ट्रीय सैनिक संस्था उत्तर महाराष्ट्र व तसेच मनोज  चौधरी कासोदा व रतन परदेशी भडगाव तालुका शिवसेना तालुकाप्रमुख व माजी सैनिक महाराष्ट्र रक्षक ग्रुप चे सदस्य विनोद परदेशी पाचोरा यांच्या सर्वांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच मनमाड शहर पत्रकार संघ रजि चे अध्यक्ष आजाद आव्हाड व अविनाश पारखे विनोद वर्मा जगदीश अडसुळे सागर भावसार तसेच मनमाड शहर शिवसेना प्रमुख मयूर बोरसे तसेच  मनमाड  बस आगार प्रमुख  प्रीतम  कुमार लाडवंजारी महेंद्र गरुड जाफर मिर्झा नगरसेवक महेंद्र शिरसाट सोनू पोहल अमोल औटी ललित परदेशी देवाशिष परदेशी दीपक कांदे आधी सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातून जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून सतीश परदेशी यांचे कौतुक करून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here