जन आरोग्य योजनेच्या हॉस्पिटलमध्ये 450 खाटा कोविड रुग्णांना मिळू शकतील-सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू

0

पनवेल – पनवेल महापालिका क्षेत्रात सरकारी हॉस्पिटलसह 13 नामांकित खासगी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू आहेत. परंतु अद्यापही त्या खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्ण सेवा सुरू झाली नाही. महापालिका आयुक्तांनी तातडीने आदेश काढल्यास 450 खाटांची व्यवस्था सहजपणे तिथे होऊ शकेल, असा दावा सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी केला आहे.कडू यांनी कालच महापालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख यांना पनवेल संघर्ष समितीच्या पत्राद्वारे यासंदर्भात कळविले आहे.आर्केट, लाईफ लाईन, उन्नती, जनकल्याण संघाचे डॉ. पटवर्धन, एमजीएम कळंबोली, डॉ. बिरमोले, पनवेल हॉस्पिटल, आशा, श्री साई मल्टी स्पेशालिस्ट खारघर, श्री सिद्धिविनायक कळंबोली, डॉ. डी. जी. पोळ, आदी नामांकित हॉस्पिटलला महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू आहे.या सर्व हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्ण सेवा सुरू केल्यास ऑक्सिजन पुरवठा असलेल्या 400 खाटा आणि पन्नास खाटा अतिदक्षता विभागात उपलब्ध होऊ शकतात.
सध्या महापालिकेकडे खाटा आहेत परंतु डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे योजनेतील दहा रुग्णालयाना आयुक्तांनी त्वरित मान्यता देणे संपूर्ण पनवेलकरांसाठी फारच उपयुक्त ठरणार आहे.कोविड रुग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार होत नाहीत. झाले तर भयंकर खर्चिक असतात. यातून कोविड रुग्णांना दिलासा देण्यासाठी आयुक्तांनी हे पाऊल उचलावे अशी अपेक्षा कडू यांनी व्यक्त करून याबाबत महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे संचालक डॉ. सुधाकर शिंदे यांच्याशी कडू यांनी चर्चा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here