कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर हेल्थ चेकअप

0

नाशिक -कोरोना विषाणुचा बाढना प्रादुर्भाव रोखण्यासाठी युधः पातळीवर सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात आहे . कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक कार्यालय , आडगांव नाशिक येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी , तसेच कार्यालयीन कर्मचारी यांचेकरीता आज दि . १५/०७/२०२० रोजी सकाळी हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते . सदर कॅम्प मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी / कर्मचारी / मंत्रालयीन कर्मचारी तसेच पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे रोजच्या डयुटीच्या ताणतणावातून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर हेल्थ चेकअप केले आहेत . सदर कॅम्प मध्ये एकुण १ ९ २ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच मंत्रालयान स्टाफ यांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली . कोविड १ ९ महामारीच्या काळामध्ये डॉ.वसंतराव पवार मेडीकल कॉलेज यांचे वैद्यकीय पथकाने केवळ पोलीस दलासाठी नाही तर सर्व सामान्यसाठी देखील महत्वाची भूमिका बजावली आहे . सदर वैद्यकिय सेवा ही २४ तास उपलब्ध असुन नाशिक ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी , कर्मचारी व त्यांचे कुटुंबातील नॉन – कोव्हीड रूगणांना ताप , सर्दी व खोकल्याचा त्रास होत असेल तर त्यांनी पोलीस फिव्हर क्लिनीक येथे उपचार घ्यावे असे आवाहन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक मा . डॉ.आरती सिंह मॅडम यांनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here