
नांदगाव- ( प्रतिनिधी निखिल मोरे ) औरंगाबादहुन मनमाड येथे जात असताना पोखरी शिवारात रिक्षा व टँक्टर यांच्यात अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर अन्य दोन्ही जखमी झाले आहे.याबाबत माहिती अशी की,औरंगाबादहुन मनमाड येथे प्रवासी सोडविण्यासाठी
रिक्षा क्रमांक एम.एच.ई.फ 0129 पोखरी शिवारात येत असताना टँक्टर क्रमांक एम.एच.डी.ई.1109 समोरासमोर टँक्टरने कट मारून ठोस दिल्याने रिक्षाला अपघात होऊन रिक्षातील राजेंद्र कुशावाह रा.नारो,पो. गिजवार ता.माझावली जि.सिधी (मध्यप्रदेश) (वय 36)याला डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली. असून नांदगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.रिक्षा मधील अन्य दोन्ही गंभीर जखमी झाले आहेत.याप्रकरणी पोलिसांत भादवी.304(अ),279,337,338,427,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पो. ह.श्रावण बोगीर करीत आहे.
