मालेगाव शहरातील अट्टल मोटर सायकल चोरटे जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – चोरीच्या ०७ मोटर सायकल हस्तगत

0

मालेगाव – मा पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह मॅडम, व अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री संदिप घुगे सो, यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री के के पाटील यांचे पथकाने जिल्ह्यातील नाउघड मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यांचे समांतर तपासात मालेगाव शहरातील ०३ सराईत चोरांना ताब्यात घेऊन चोरीच्या ०७ मोटर सायकल जप्त केल्या आहे .आरोपींची नावे१) महम्मद रमजान महम्मद इब्राहिम उर्फ रमजान काल्या, वय २१, रा निहालनगर, सुन्नीपुरा, मालेगाव२) नाविद अहमद शकील अहमद उर्फ नाविद टकाऱ्या, वय २१, रा दत्तनगर, हमीद चौक, मालेगाव३) वसीम अहमद मोहमद फारुख, वय २८, रा दत्तनगर, मालेगाव

यातील आरोपी रमजान काल्या व नाविद टकाऱ्या हे चोरीच्या मोटर सायकल विक्रीसाठी वसीम अहमद याच्याकडे घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती स्थागुशाचे पथकास मिळाली होती, त्यानुसार पथकाने मुंबई आग्रा हायवेवर सवंदगाव फाटा परिसरातुन वरील आरोपींना ताब्यात घेतले आहे.जप्त मुद्देमाल – ०१ स्प्लेंडर प्लस, ०१ यामाहा एफ झेड, ०२ सुझुकी जिक्सर, ०१ हिरो एच एफ डीलक्स, ०१ होंडा शाईन, ०१ स्प्लेंडर प्रो अशा एकूण ०७ चोरीच्या मोटर सायकल व ०२ सॅमसंग, ०१ रिअलमी, ०१ ओप्पो असे ०४ मोबाईल फोन असा एकूण ०२ लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .सदर बाबत वडनेर खाकुर्डी, पवारवाडी व धुळे शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे .यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर यापूर्वी मालेगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये व धुळे जिल्ह्यात मोटर सायकल चोरी, जबरी लूटमार, आर्म ऍक्ट, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहे।।सदर तीनही आरोपींना वडनेर खाकुर्डी पो स्टे कडील गुन्हा नंबर १२५/२०१९ भादवि ३७९ ह्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांचेकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री के के पाटील यांचे पथकातील पोहवा सुहास छत्रे, वसंत महाले, पोना राकेश उबाळे, चेतन संवत्सरकर, देवा गोविंद, पोकॉ फिरोज पठाण, रतीलाल वाघ, दत्ता माळी यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here