
मुंबई – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर काल संध्याकाळी अज्ञात व्यक्तींने तोडफोड केली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या काचां वरही दगडफेक झाली असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.दोन माथे फिरुंनी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार केल्याचा आरोप आहे. घराबाहेरील सीसीटीव्हीचेही मोठे नुकसान केले. पोलीस घटनास्थळी तपास करत आहे. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटीला येत असतात. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे स्थान आहे.“राज्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. ‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपण शांतता राखावी” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. या कृत्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे,
