जनता कर्फ्यू करण्याची मागणी- शहर व्यापारी वेल्फेअर असोशियन. मनमाड

0

मनमाड – शहरातील कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहर व्यापारी वेल्फेअर असोसिएशन मनमाड संघाने आज निवेदन दिले आहे, निवेदनात मनमाड शहरातील गेल्या काही दिवसा पासून शहर किंवा शहराच्या लगत असलेली खेडे यामध्ये कोरोनाचा संसर्गजन्य रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात होत आहे , या रोगाचे प्रमाण वाढू नये या संसर्गजन्य रोगाची साखळी तोडण्यासाठी मनमाड शहर व्यापारी महासंघाने संपूर्ण मनमाड शहर बुधवारी 8-7- 2020 पासून ते रविवार 12-7-2020 पर्यंत जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेतलेला आहे, तरी परिसरातील सर्व नागरिक व्यापारी बांधव यांनी सर्व व्यवहार बंद करून कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सहभागी व्हावे प्रशासनाने पण आवश्यक ते सहकार्य करावे अशी विनंती शहर व्यापारी वेल्फेअर असोसिएशन मनमाड यांच्या मार्फत करण्यात आली आहे, या निवेदनावर अध्यक्ष राजेंद्र पारीक, उपाध्यक्ष,राजकमल पांडे सचिव, किसनलाल बंब, अनिल गुंदेचा सहसचिव, मनोज जंगम कोषाध्यक्ष ,कुलदीपसिंग चोटमुरादी सहकोषाध्यक्ष, सुरेश लोढा,श्यामकांत शिरोडे, रीखभाऊ ललवानी,रईसभाई फारुकी,निलेश व्यवहारे,मनोज आचलिया आदींच्या या निवेदनावर सह्या आहे,सदरील निवेदन मनमाड नगर परिषद राजेंद्र पाटील,पोलीस निरीक्षक कुटे सो, मनमाड , तसेच मंडळ अधिकारी कैलास चौधरी मनमाड यांना देण्यात आले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here