मनमाड कर नागरिकांनी सावधान ,आता चुकलात तर पुन्हा संधी नाही

0

मनमाड – शहरातील आणि तसेच आसपासच्या ग्रामीण परिसरातील बंधू भगिनींनो,
आपले शहर आणि ग्रामीण भागातील व्यापारी वर्ग,व्यावसायिक,अधिकारी कर्मचारी वर्ग, बँका,सहकारी माध्यम,सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय कार्यकर्ते आपण सर्वांना कळकळीची,आग्रहाची नम्र विनंती आहे की,
आपल्या शह रात आणि परिसरात करोनाचे थैमान सुरू आहे,त्यात आतापर्यंत चार अनमोल व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे,
मनमाडकरांनो आता पर्यंत ८५ लोकांना संसर्ग झालेला आहे.त्यापैकी 52 आजार बरे होऊन घरी गेलेत,भीती बाळगण्याचे कारण नाही या मृत व्यक्तीमध्ये सर्वच थरातील नागरिक आहेत, परंतु व्यापारी, व्यावसायिक,आणि अधिकारी कर्मचारी वृंद यांनी विशेष काळजी घ्यावी असे एकंदरीत चित्र आहे,कारण या वि शाणुचा दुकाने, दवाखाने,रुग्णालये,बँका, ऑफिसेस,वित्तीय संस्था मध्ये शिरकाव झालेला दिसतो कारण त्याठिकाणी जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर आहे, गर्दी होणे,गर्दीचे भान न ठेवणे,सामाजिक अंतर न ठेवणे,मास्क न वापरणे,वेळोवेळी sanitize athwa disinfection n करणे या गोष्टीचे पालन न केल्याने चैन ब्रेकिंग होत नसल्या मुळे तसेच कुटुंबातील व्यक्तीने आजार भीतीपोटी लपवून ठेवल्याने, वेळीच आजाराची दखल न घेतल्याने कुटुंबातील सदस्यांना व संपर्कातील इतरांना बाधित केल्याने रुग्णांचीं संख्या ज्यास्त प्रमाणात वाढत आहे.
सर्व कापड दुकानदार,किराणा व्यापारी, पालेभाज्यांचे विक्रेते फळांचे विक्रेते,मटण चिकन मासे विक्रेते,डॉक्टर्स,रुग्णालय चालकांनी खूप ज्यास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे.
त्या साठी खालील सूचनांचे काटेकोर पणे पालन केल्यास ही भयंकर परिस्थिती आटोक्यात येण्यास मदत होईल.नियम आणि शिस्त आपल्याला वाचवू शकतात.
1) करोणा विषाणूची साखळी तोडणे,म्हणजेच चैन ब्रेकिंग.
या साठी आपणास टायमिंग ची बंधने काटेकोर पाळावी लागतील. करोणा व्हायरस पृष्ठभागावर अंदाजे 16 तास जिवंत राहू शकतो त्या नंतर तो मृत पावतो.म्हणजेच आपली दुकाने,व्यवसाय फक्त 6ते7 तास चालवावी 16 तास बंद असावी म्हणजे काऊंटर वरील विषाणू नष्ट होतील.
२)दवाखाने,दुकाने, ऑफिस काऊंटर स्वच्छ पुसून सोडियम हायापो क्लोराईड १% ने डीस इनफेक्ट केल्यास 100 टक्के रिझल्ट मिळेल.
3)सर्व व्यापारी आणि व्यावसायिकांनी,कर्मचारी वर्गाने फुल कपडे वापरणे मास्क ,टोपी, हात मौजे वापरणे.ग्राहकास मास्क बंधन कारक करणे.
4) स्वतःचे आणि ग्राहकाचे ✋sanitization बंधनकारक असावे.
5)आपले आणि ग्राहकाचे अंतर तसेच दोन ग्राहका मधील अंतर 3ते6 फूट.असावे..दोघे जण बोलताना अंतर ठेवावे
6)व्यवसायाच्या ठिकाणी खेळती हवा,भरपूर उजेड असल्यास आणि गरम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली तर आपल्या आरोग्याचे धोके खूपच कमी होतील.
7)आता पावसाळा असल्या मुळे माशांचे (हाऊस फ्लाय) प्रमाण वाढते त्यांच्या माध्यमातून देखील कॅरोनाचा फैलव होवू शकतो त्या बद्दल देखील खबरदारी घावी.
8) काही घरात कुटुंबातील सर्व सदस्य बाधित आढळतात.कारण सर्व विसरून एकत्र आल्याने एकाची लागण दुसऱ्याला होते, त्याचे कारण म्हणजे आपण घरी गेल्या नंतर हात साबनाने स्वच्छ धुणे,आंघोळ करणे,कपडे डिटर्जंट ने धुणे खूप गरजेचे आहेत.असे केल्यास घरातील इतर सदस्यांना संसर्ग होणार नाही.
9)घरी आणलेल्या नोटा आणि पैसे यांचे देखील 24 तास विलागिकरण करावे,sanitization karave म्हणजे व्हायरस नष्ट होतात.
10)गर्दी करू नका,गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका,आणि गर्दी होऊ देऊ नका हाच करोना उच्चाटन करण्याचा महामंत्र आहे.
11)आपले कॅप मास्क डीस्पोसेबल वापरा, रोज बदला.लगेच जाळून नष्ट करा काळजी घेणे.12)वयोवृध्द व्यक्ती,लहान मुले यांनी शक्यतो घराबाहेर काही काळ जाऊच नये.१३)थोडा जरी त्रास वाटला तर न लाजता,भीती न बाळगता वैदयकीयदृष्ट्या सल्ला घ्यावा.१४)काळजी घ्या घराबाहेर पडायचे टाळावे.आवश्यक असेल तरच अत्यावश्यक कामासाठी बाहेर जावे.
धन्यवाद.
डॉ. दिलीप मेनक र, मुख्याधिकारी,मनमाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here