स्थानिक गुन्हे खात्याची धडक कारवाई सराईत गुन्हेगारांना अटक

0

   इगतपुरी –  दिनांक १ ९ जुन २०२० रोजी मध्यरात्रीचे सुमारास इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील व्यावसायीक श्री . निलेश अग्रवाल यांचे मालकीचे घोटी शहरातील अग्रवाल टॉवर मधील श्री राधे मोबाईल शॉपीचे शटर कोणीतरी अज्ञात चोरटयांनी उचकावुन अनाधिकृतपणे आत प्रवेश केला , व दुकानातील विक्रीसाठी ठेवलेले लाखो रूपये किंमतीचे मोबाईल स्मार्टफोन घरफोडी चोरी करून नेले म्हणुन घोटी पोलीस ठाणेस । गुन्हा रजि.नं. ७ ९ / २०२० भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक मा.डॉ.आरती सिंह मॅडम व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर मॅडम यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.के.के.पाटील यांचे पथकाने सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरू केला . सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी हे गुन्हा करतेवेळी दुकानातील सी.सी.टी.व्ही . कॅमेरामध्ये कैद झाले होते , आरोपीतांनी तोंडाला रूमाल व मास्क लावलेले असल्याने त्यांची ओळख पटविणे पोलीसांसमोर आवाहन होते . सी.सी.टी.व्ही . फुटेजची पडताळणी करून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आरोपीतांचा कसोशिने शोध सुरू केला . वरील गुन्हयातील अज्ञात आरोपींचे वर्णनाशी साम्य असलेले काही संशयीत घोटी सिन्नर रोडवरील खेडयांवरील असल्याची गोपनीय माहिती स्थागुशाचे पथकास मिळाली , त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सिन्नर तालुक्यातील शिवडे परिसरातुन संशयीत आरोपी नामे १ ) अमोल भावराव भगत , वय २१ , रा . महादेववाडी , शिवडे , ता.सिन्नर यास सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले , त्यास विश्वासात घेवुन त्याचे कब्जात मिळुन आलेले मोबाईल बाबत विचारपुस करता त्याने उडवा – उडवीची उत्तरे दिली , त्यास पोलीसी खाक्या दाखविताच त्याने त्याचे साथीदार २ ) योगेश काळु निरगुडे , वय १ ९ , ३ ) विठ्ठल दामु ठोंबरे , वय २० , ४ ) विश्वास प्रभाकर ठोंबरे , वय २० , ५ ) मावंजी कोंडजी मेंगाळ , वय २४ , सर्व रा . महादेववाडी , शिवडे , ता.सिन्नर , जिल्हा नाशिक यांचेसह गेल्या १५ दिवसांपुर्वी मध्यरात्रीचे सुमारास घोटी शहरातील मुख्य बाजारपेठेतील एक मोबाईल शॉप फोडुन महागाचे स्मार्ट मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली आहे . यातील आरोपी अमोल भगत याचे इतर चारही साथीदारांना स्थागुशाचे पथकाने घोटी – सिन्नर परिसरातुन ताब्यात घेतले आहे . त्यांचे कब्जातुन वरील गुन्हयात चोरीस गेलेले सॅमसंग , ओपो , रिअल – मी , व्हीवो , रेडमी , एम . आय . , टेक्नो , इंटेल , इन्फोनेक्स अशा कंपनीचे एकुण २६ मोबाईल स्मार्ट फोन किंमत रूपये ०२ लाख ६ ९ हजार २४ ९ चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे . यातील ताब्यात घेतलेला आरोपी अमोल भगत यास अधिक विचारपुस केली असता त्याने गेल्या एप्रिल महिन्यातही त्याचे साथीदार विश्वास ठोंबरे व मावंजी मेंगाळ यांचेसह घोटी सिन्नर रोडवरील एस.एम.बी.टी वैद्यकिय महाविद्यालयासमोरील ओमसाई मोबाईल शॉप फोडल्याची कबुली दिली असुन सदर बाबत वाडीव – हे पोलीस ठाणेस दाखल असलेला । गुन्हा रजि.नं. ३७/२०२० भादवि कलम ४५७,३८० हा गुन्हा उघडकीस आलेला आहे . यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेकडुन घरफोडीचे अजुन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे , त्यांना गुन्हयाचे पुढील तपासकामी घोटी पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे . नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या मा.पोलीस अधीक्षक डॉ . आरती सिंह मॅडम व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर मॅडम यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री.के.के.पाटील , सपोनि अनिल वाघ , सपोउनि नवनाथ गुरूळे , पोहवा बंडु ठाकरे , शिवाजी जुंदरे , पोना प्रितम लोखंडे , सचिन पिंगळ , निलेश कातकाडे , प्रदिप बहिरम , हेमंत गिलबिले यांचे पथकाने वरील ०५ आरोपींना ताब्यात घेवुन घरफोडीचे ०२ गुन्हे उघडकीस आणलेले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here