नाशिक : एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीत “एस.एन.पी.टी. टॉक” ‘गेट एम्प्लॉयमेंट रेडी’ या कार्यशाळेत रोजगारक्षमतेसाठी आवश्यक कौशल्यांचा विकास” या व्याख्यानमालाचे अनावरण करण्यात आले, या वेळी
विद्यार्थ्यांना रोजगाराच्या क्षेत्रात सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीत “एस.एन.पी.टी. टॉक” टीमने एक महत्वाची व्याख्यानमाला आयोजित केली ‘’गेट एम्प्लॉयमेंट रेडी’’ या कार्यशाळेत रोजगारक्षमतेसाठी आवश्यक कौशल्यांचा विकास” या व्याख्यानमालाचे आयोजन ७ फेब्रुवारी २०२५ रोजी झाले असून या व्याख्यानमालाचे प्रमुख मार्गदर्शक मान्यवर डॉ. उपेंद्रभाई दिनानी, अध्यक्ष आणि संचालकऑफ डी विजय फार्मा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, यांचे उद्योग क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वाचे ठरले. या कार्यक्रमात त्यांनी रोजगारक्षमतेसाठी आवश्यक असलेले मुद्दे मांडले. करिअरचे स्पष्ट ध्येय ठरवणे किती महत्त्वाचे आहे, यावर चर्चा करण्यात आली.तसेच भारताने औषध उत्पादन उद्योगामध्ये जगभरात आपले स्थान मजबूत केले आहे. या सत्रात, भारताची फार्मास्युटिकल्स क्षेत्रातील महत्त्वाची भूमिका आणि यामुळे तयार होणाऱ्या जागतिक संधींबद्दल चर्चा करण्यात आली. यामुळे फार्मसी विद्यार्थ्यांना जागतिक औषध उद्योगातील विविध संधींबद्दल साक्षात्कार झाला. संपूर्ण जगात भारतातील ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरस (GCCs) चे महत्त्व वाढत आहे. हे केंद्रे विविध प्रकारचे कामकाज, तंत्रज्ञान आणि संशोधन कार्ये करतात. यामुळे नोकरी संधी आणि उद्योगातील स्पर्धात्मकता वाढते, यावर सखोल चर्चा झाली. ऍडव्हान्स एक्सेलच्या वापराबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. एक्सेल जसे टूल्स, फॉर्म्युला, पिवट टेबल्स आणि डेटा अॅनालिसिससाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवर चर्चा झाली. हे कौशल्य फार्मास्युटिकल्ससह विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. फार्मसी पदवीधरांसाठी असलेल्या विविध करिअर संधींबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सत्रात, औषध उद्योगातील नोकऱ्या, संशोधन व विकास, फार्मास्युटिकल सेल्स, आणि नियामक कार्यामध्ये कसा करिअर घडवता येईल, यावर चर्चा झाली. जर तुम्ही योग्य कौशल्य आणि क्षमता विकसित केल्या, तर तुमच्या करिअरची सुरुवात चांगली आणि उज्ज्वल होईल. कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची संधी घेतली, ज्यात डॉ. दिनानी यांनी सविस्तर उत्तर दिले. विद्यार्थ्यांना त्यांच्या सल्ल्यांचा फार फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.नरेंद्रभाई ठक्कर, सचिव मा. श्री. देवेंद्रभाई पटेल, फार्मसी विभागाचे सचिव मा. श्री. उपेंद्रभाई दिनानी, संस्थेचे संयुक्त सचिव मा. श्री. अभयभाई चोक्सी. व प्राचार्य. डॉ. विशाल गुलेचा यांनी शुभेच्छा दिल्या.
Home Breaking News एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीत “एस.एन.पी.टी. टॉक” ‘गेट एम्प्लॉयमेंट रेडी’...








