येवला : सोमनाथ सूर्यवंशी ला न्याय मागण्यासाठी परभणी करांचा लॉंग मार्च मुंबईवर धडकणार
परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी तसेच मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख व बाबा वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून परभणी ते मुंबई लॉंग मार्च मुंबईला धडकणार
परभणी ते मुंबई लॉंग मार्च चे नेतृत्व आशिष वाकोडे करत असून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसेच विजय वाकोडे बाबा यांच्यावर पोलिसांचा दबाव व सोमनाथ सूर्यवंशी यांना झालेली मारहाण यातून झालेला मृत्यू याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करून निलंबित करावे या मागणीसाठी परभणी ते मुंबई लॉन्ग मार्च येवला मुकतिभुमी येथे दाखल होऊन येवल्यातील मुक्तिभुमी येथे बाबसाहेब आंबेडकरांच्या व तथागत बुद्धांच्या भव्य मुर्ती समोर नतमस्तक होत अभिवादन करून लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करीत होता
. यावेळी आंबेडकरवादी व संविधानप्रेमी युवकांनी परभणी ते मुंबई जाणाऱ्या लाँग मार्च लां पाठिंबा देत व सहभागी होऊन आलेल्या आंबेडकर अनुयायांना भोजनाचे व्यवस्था करून सहभाग नोंदवला यावेळी प्रवीण संसारे ,युवराज पगारे, मंगेश साबळे, नितीन गरुड, संजय पगारे, शशिकांत जगताप ,चंद्रकांत निकम , कुमार भाऊ मेघे, नितीन संसारे, योगेश पोळ, पोपट खंडागळे, यांच्यासह आंबेडकरी कार्यकर्ते उपस्थित होते