आ.राजळेंचा “पंकजाताई बाग फुलवतेरे, बिजेपीच्या कमळाचा,”तर “रामकृष्ण हारी,वाजवा तुतारी”च्या निनादात प्रतापराव ढाकणेंचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीअर्ज दाखल

0

अहमदनगर (सुनिल नजन/ “चिफब्युरो”/अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे मतदारसंघ आहेत तेवढ्या मतदारसंघातील सर्व 288 जागा एकट्या अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात लढविल्या जात आहेत. या वरूनच अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवार किती पराक्रमी आहेत हे सिद्ध होते. याच जिल्ह्यातील 222 शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात 36 लोकांनी 47 उमेदवारीअर्ज दाखल केले आहेत. उमेदवारीअर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या वतीने आमदार मोनिकाताई राजळेचा “पंकजाताई बाग फुवतेरे, बिजेपीच्या कमळाचा,बिजेपीच्या कमळाचा”या गाण्याच्या तालावर महिलांनी घोषणाबाजी करून मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीअर्ज दाखल केला.तर त्यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदपवार गटाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांनी ”
रामकृष्ण हारी,वाजवा तुतारी”च्या निनादात आपल्या समर्थकांसह मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीअर्ज दाखल केला.त्यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती प्रभावती ढाकणे आणि चिरंजीव ऋषिकेश ढाकणे हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी प्रतापराव ढाकणे म्हणाले की सत्ता हे साधन आहे साध्य नाही. गेली चार वर्ष मी गोरगरीब जनतेची सेवा केली आहे म्हणून माझा विजय निश्चित आहे.आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या की संपुर्ण मतदारसंघात गेली दहा वर्षे मी विज,रस्ते,पाणी,बंधारे,सभामंडप, लाडकी बहिण योजनेचे विनामूल्य अर्ज भरून गोरगरीब जनतेची सेवा केली आहे.राहिलेला विकास करण्यासाठी जनता मला पुन्हा निश्चित निवडूण देणार असल्याचे राजळे यांनी सांगितले.या वेळी त्यांच्यासमवेत जाऊबाई मोनालीताई राजळे,राहुल राजळे, चारूदत्त वाघ, यांच्यासह मतदारसंघातील अनेक गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार मोनिकाताई राजळे यांनी प्रथम आपल्या कासार पिंपळगाव येथील सर्व मंदिरात वाजत गाजत जाऊन सर्व देवादिकांना नमस्कार करीत आशिर्वाद घेऊन मग आपल्या फौजफाट्यासह शेवगावच्या दिशेने वाटचाल करीत आगेकूच केली.सौ. हर्षदाताई काकडे,राजळे,ढाकणे,चंद्रशेखर घुले, गोकुळ दौंड,संदिप शेलार,शिवहार काळे,अंकुश चितळे,आत्माराम कुंडकर, चंद्रकांत लबडे,सुधाकर चोथे,एकनाथ सुसे, सुहास चव्हाण, तुळशीराम पडळकर, सुभाष साबळे,युनुस शेख,स्नेहल फुंदे,बाळु कोळसे,अमोल पेटारे,अर्जुन वारे,उद्धव माने,निलेश बोरूडे यांच्यासह एकूण 36 जणांनी उमेदवारीअर्ज दाखल केले आहेत.खरे चित्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच चार नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते हे काम पाहत आहेत. तर पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, आणि शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here