मनमाड : मनमाड वर्कशॉप मध्ये सर्व कामगार संघटना मिळून बलीप्रतिपदानिमित्त सम्राट बळीराजाचे स्मरण व गौरव करण्यात आला.बलीप्रतिपदादिन म्हणजे सम्राट बळीराजाचे स्मरण व गौरव करण्याचा दिवस होय.सम्राट बळीराजा हा बहुजन समाजाचा श्रेष्ठ पुर्वज होता.प्रत्येक श्रम करण्याऱ्या प्रत्येक माणसाला बळीराज्यात प्रतिष्ठा होती.
मनमाड वर्कशॉप मध्ये दरवर्षी बलिप्रतिपदा या दिवशी बळीराजाचे स्मरण व गौरव करण्यात येते.
वर्कशॉप ला सलग सुट्टी आल्यामुळे गुरुवारी बळीराजाच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
कर्मचारी संजय अहिरे व कांतिलाल कातकडे यांच्या हस्ते सम्राट बळी राजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशन कारखाना शाखेचे अध्यक्ष सतिश भाऊ केदारे, असोसिएशन कारखाना शाखेचे सचिव प्रविण अहिरे, कारखाना शाखेचे खजिनदार संदिप धिवर, अतिरिक्त सचिव सागर गरूड, नेशनल रेल्वे मजदूर युनियन कारखाना शाखा चे सचिव चे सचिव रमेश केदारे, चंद्रशेखर दखणे,अक्रम शेख, संदिप अहिरे, सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखेचे सचिव व ई.सी.सी.बॅकचे डेलिगेट नितीन पवार, कारखाना शाखेचे कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल, कारखाना शाखेचे खजिनदार मुक्तार शेख, उपाध्यक्ष गणेश हाडपे,ओ बी सी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कारखाना शाखेचे अध्यक्ष रतन निकम, सचिव शशिकांत आढोरकर,आर.एम.बी.के.एस.कारखाना शाखेचे अध्यक्ष सुनिल भोसले, खजिनदार गौतम गरुड, राजेंद्र अहिरे, सिनियर सेक्शन इंजिनिअर रविंद्र साळी, सिनियर सेक्शन इंजिनिअर धनंजय घोडके, ज्युनिअर इंजिनिअर नितीन दराडे, ज्युनिअर इंजिनिअर सागर साळवे, कार्यालय अधीक्षक चंद्रमणी सुखदेव,मुन्ना कुमार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रविण बागुल यांनी केले.तर आभारप्रदर्शन अर्जुन बागुल यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन वैभव कापडे, विनोद झोडपे, बाळासाहेब पवार, मनोज गाजरे, नितीन पवार, संतोष सोनवणे, साईनाथ लांडगे,हर्षद सुर्यवंशी,रूपेश साळवे,अभय कुमार, मनिष साळवे, कल्याण धिवर,मुन्नावर पठाण, प्रदिप अहिरे, त्रिलोक पटेल, सुमित अहिरे, विशाल बागुल आदि ने केले.
Home Breaking News मनमाड वर्कशॉप मध्ये सर्व कामगार संघटना मिळून बलीप्रतिपदानिमित्त सम्राट बळीराजाचे स्मरण व...